मालिकांमध्ये प्रत्येक सण उत्साहात साजरे केले जातात. तसेच ‘सन मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिकांमध्ये होळी साजरी होताना पाहायला मिळत आहे. पण याबरोबरच होळीनिमित्त प्रत्येक मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत सत्या मंजूच्या साखरपुड्यानंतर दोघेही होळी पेटवत असताना काही गुंड मंजूला किडनॅप करतात. आता सत्या मंजूला शोधू शकेल का? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येते. तर ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत नकळतपणे धैर्य- सावी एकत्र होळीमध्ये नारळ वाहतात. या सणानिमित्त धैर्य- सावीमध्ये प्रेमाचं नातं फुलणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Snehalata Vasaikar shared her childhood memories of Holi festival)
अशातच ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत भैरवी आणि अंजली मिळून सईविरुद्ध नवा डाव रचतात. एकंदरीतच प्रेक्षकांना सर्व मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. होळी म्हणजे वाईट गोष्टी संपवून चांगल्या गोष्टींची सुरुवात होऊ दे अशी प्रार्थना करत आणि रंगाची उधळण करत हा सण जल्लोषात साजरा केला जातो. ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत भैरवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकरने लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत यंदाच्या होळीत स्वभावातील एक गोष्ट दहन करण्याबद्दल भाष्य केलं आहे.
स्नेहलता म्हणाली, ‘लहानपणीच्या आठवणी म्हणजे आईच्या हातची पुरणपोळी व कटाची आमटी सगळ्यात आवडती गोष्ट होती. दोन दिवसानंतर मी शाळेत डब्बा भरून पुरणपोळी घेऊन जायचे. होळी पेटवण्यासाठी लाकडं गोळा करणे, रंग खेळणे ही सगळी धमाल असायची त्यामुळे पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडेल. बाकी माझा स्वभाव रोखठोक आहे. माझ्या मनात जे असतं तेच ओठांवर येत त्यामुळे माझा स्वभाव मला बदलायचा नाहीये. पण या होळीत माझ्या स्वभावातील एक गोष्ट दहन करावीशी वाटते’.
‘ती अशी की, एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर त्या गोष्टीच्या अर्ध्यापर्यंत पोहचल्यावर मी ती गोष्ट करू शकेन का ही शंका येते. त्यामुळे मी अचानक माझा निर्णय मागे घेण्याचा विचार करते. म्हणून ”अशक्य असं काहीच नसत” हा फंडा कायम लक्षात ठेवून पुढे चालत राहायचं ठरवलं आहे.लक्षात राहिलेली होळी सांगायचं झालं तर यापूर्वी मी ऐतिहासिक मालिका करत होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होळी मी अनुभवली आहे आणि ती होळी कायम माझ्या स्मरणात राहील’. सध्या ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेच्या सेटवर होळीचे शूटिंग सुरू असल्याने आनंदमय वातावरण आहे.
हेही पहा –
Mi Pathishi Ahe Movie : मी पाठीशी आहे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित