Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग ...आणि सनी देओलच्या चेहऱ्यावर बर्फ साठला ; Video Viral

…आणि सनी देओलच्या चेहऱ्यावर बर्फ साठला ; Video Viral

Subscribe

सध्या सनी देओल 'गदर टू' च्या शुटिंगमध्ये व्यस्त असून, ते आता मनालीमध्ये आहेत. सनी देओल हे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे चाहत्यांशी सतत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकतंच सनी देओल यांनी मनालीमधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत अधिराज्या गाजवले आहे. सनी देओल हे त्यांच्या चित्रपटाशिवाय स्टाईलसाठीही प्रसिद्ध आहेत.त्यांनी अभिनेता म्हणूनच नाही तर,दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. सध्या सनी देओल ‘गदर टू’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त असून, ते आता मनालीमध्ये आहेत. सनी देओल हे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे चाहत्यांशी सतत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकतंच सनी देओल यांनी मनालीमधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. जो व्हिडीओ पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये अभिनेता सनी देओल मनालीमध्ये असून ,त्यांच्या चेहऱ्यावर बर्फ दिसत होता. व्हिडीओमध्ये सनी देओल त्यांचा चेहरा बर्फात वाकवून चेहरा व्हिडीओ समोर दाखवतो.जेव्हा तो आपला चेहरा वर काढतो तेव्हा त्याच्या दाढीवर आणि नाकावर बर्फ साचलेला दिसतो.त्यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत ८१ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.विशेष म्हणजे सनी देओल यांची सावत्र बहीण ईशा देओलनेही यावर कमेंट केली आहे. हसणारा इमोजी शेअर करत तिने ‘भाऊ…’ अशी कमेंट केली आहे. याशिवाय प्रसिद्ध फोटोग्राफर डप्पू रतनानी यांनीही सनी देओलच्या व्हिडिओवर हार्टचे इमोजी शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. सनी देओल आणि ईशा देओल सावत्र भावंड असूनही त्यांच्यातील बॉन्डिंग अफलातून आहे.


हे ही वाचा – इजिप्तमध्येही किंग खानचा बोलबाला; ‘Shah Rukh Khan’ मुळे मराठमोळ्या महिलेला झाला असा फायदा


- Advertisement -

 

- Advertisment -