Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन खलिस्तानवरून कंगना रनौत आणि दिलजीत दोसांझलामध्ये सुरू झाले सोशल मीडिया वॉर

खलिस्तानवरून कंगना रनौत आणि दिलजीत दोसांझलामध्ये सुरू झाले सोशल मीडिया वॉर

Subscribe

मागील काही दिवसांपासून पंजाबमध्ये अमृतपाल सिंग हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. अमृतपाल सिंग हा ‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असून तो सध्या फरार असल्याने पंजाबमध्ये गोंधळ सुरु आहे. दरम्यान, नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या कंगनाने या प्रकरणी ट्वीट करत पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझलावर निशाणा साधला होता.

kangana-2

- Advertisement -

कंगनाने तिच्या सोशल मीडियावरील एक मीम शेअर करत दिलजीतला टोला लगावला ज्यात तिने “दिलजीत दोसांझ जी पोल्स आ गई पोल्स,” असं लिहिलं होतं. याबरोबरच कंगनाने अजून एक पोस्ट शेअर केली होती ज्यात तिने “खलिस्तान्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांनी लक्षात ठेवा, पुढचा नंबर तुमचा आहे, पोल्स(पोलिस) आले आहेत आणि ही ती वेळ नाही जेव्हा कोणी काहीही करायचं, देशासोबत गद्दारी किंवा त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न तुम्हाला खूप महागात पडेल.” असं कंगना म्हणाली.

- Advertisement -

 

दरम्यान, आता यावर दिलजीत दोसांझलाने सोशल मीडियावरुन कंगनाला प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यात त्याने “माझं पंजाब नेहमी बहरत राहू दे” असं पंजाबी भाषेत लिहिलं आहे. सोबतच त्याने हात जोडलेले इमोजी देखील टाकली आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांनी शनिवारी(18 मार्च) रोजी अमृतपाल सिंगने मोहीम सुरू केली होती. मात्र, नंतर तो फरार झाला. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 114 जणांना अटक करण्यात आली आहे.

 


हेही वाचा :

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यात विराटने केला ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -