सोफिया हयात ‘सेक्‍शुअल रिलेशन’मध्ये? निघाले बिग बॉस कनेक्शन

Sofia Hayat accused of having Sexual Relationship with Abhinav Shukla
सोफिया हयात 'सेक्‍शुअल रिलेशन'मध्ये? निघाले बिग बॉस कनेक्शन

कलर्स वाहिनीवरील बिग बॉस रिअॅलिटी शो खूपच लोकप्रिय आहे. हा शो जरी संपला तरी या शोमधील सदस्यांची चर्चा नेहमीच सुरू असते. या सदस्यांविषयी अनेक खुलासे होत असतात. आज बिग बॉस फेम सोफिया हयातची (Sofia Hayat) खूपच चर्चा रंगली आहे. कारण सोफिया सेक्‍शुअल रिलेशनमध्ये असल्याचा खुलासा झाला असून तिचे कनेक्शन बिग बॉसच्या घरातील सदस्यासोबत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या सोफियाची जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमका प्रकार काय आहे?

सोफिया हयातवर एका ट्रोलरने खळबळजनक आरोप केला आहे. सोफिया हयात हिचे बिग बॉस सीझन १४ मधील सदस्य अभिनव शुक्लासोबत (Abhinav Shukla ) अफेअर असल्याचा दावा ट्रोलरने केला आहे. एवढेच नाही तर या युजरने सोफियाला ‘स्वस्त पॉर्न स्टार’ म्हटले आहे आणि तिच्या मरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या ट्रोलरला उत्तर देण्यासाठी सोफियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. इतकेच नाही तर मॅसेजचा स्क्रीनशॉट देखील तिने शेअर केला आहे. सोफियाने स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘अभिनव शुक्लाला ती ओळखत नाही, अशात ‘वन नाईट स्टँड’ किंवा सेक्‍शुअल रिलेशनमध्ये (Sexual Relationship) असल्याचे प्रश्न उपस्थित राहू शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे सोफियावर आरोप लावणारी एक महिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

युजरने सोफियाला दिली धमकी

सोफियाने इन्स्टाग्रामवर माहिती दिली की, पहिल्यांदा या व्यक्तीने तिच्याकडून मदत मागितली होती, परंतु अशा हरकतीमुळे ब्लॉक केले. मात्र त्या व्यक्तीने दुसरे अकाउंट तयार केले आणि पुन्हा सोफियाला धमकीचे मॅसेज पाठवले. तसेच तिला वेश्या म्हटले. सोफियाने याबाबत स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘खतरों के ख‍िलाडी ११’चा सदस्य अभिनव शुक्लासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध नाही आहे. जेव्हा अभिनवबाबत गूगलवर सर्च केले तेव्हा तिला तो कोण आहे, हे कळाले. जे लोकं अशाप्रकारे अफवा पसरवतात, त्यांनी सत्याची पडताळणी केली पाहिजे.

पाहा सोफियाचा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)