Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन महाराष्ट्राचे भावजी आदेश बांदेकरांच्या मुलाचे अभिनयात पदार्पण

महाराष्ट्राचे भावजी आदेश बांदेकरांच्या मुलाचे अभिनयात पदार्पण

आदेश आणि सुमित्रा बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकर हा आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Related Story

- Advertisement -

टेलिव्हिजनवरील ललित २००५ या मालिकेच्या निर्मात्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर ‘सोहम बांदेकर’ आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. निर्मात्याची भूमिका पार पाडत असताना सोहमला अभिनयाची देखील आवड आहे. इतर कलाकारांना सेटवर काम करताना पाहून हा सीन मी कसा केला असता? याचा सोहम नेहमी अभ्यास करायचा. ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या निमित्ताने हा सुवर्णयोग जुळून आला. ‘सोहम बांदेकर’ हा आता नवे लक्ष्य या मालिकेत दिसणार आहे. पी.एस.आय. जय सुवर्णा दिक्षित अशी व्यक्तीरेखा सोहम सध्या या मालिकेत पार पाडणार आहे. ‘नवे लक्ष्य’ या भूमिकेबद्दल सांगताना सोहम म्हणाला, पोलिसांचं कार्य शब्दात मांडता येत नाही. त्यामुळे या खऱ्या हिरोंना साकारणं माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक असल्याचे त्याने सांगितले.

सीनसाठी वर्दी चढवल्यानंतर एक वेगळंच स्फुरण चढतं. या वर्दीत एवढी ताकद आहे की थकवा अजिबात जाणवत नाही. मी पीएसआय जय ही व्यक्तीरेखा साकारतो आहे. जयला लहानपणापासूनच वर्दीचं पॅशन आहे. स्त्रियांचा आदर असलेला, वडिलांचं चॅलेंज स्वीकारुन एमपीएससी टॉप करणारा असा हा जय आहे. जयचे त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे. आणि म्हणूनच त्याच्या नावातही तो आई लावतो. खऱ्या आयुष्यातही मला माझी आई खूप जवळची आहे. आई-बाबा दोघांचाही खंबीर पाठिंबा असल्यामुळे मी हे आव्हान स्वीकारु शकलो. गेले वर्षभर मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. याचा उपयोग मला जयची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी होत आहे. लक्ष्यवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम नवे लक्ष्यलाही मिळेल याची मला खात्री आहे. असे सोहम म्हणाला.


- Advertisement -

हे ही वाचा- अगंबाई सासूबाईनंतर आता सूनबाई येणार प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisement -