‘सोयरीक’ मधून पुन्हा गोंधळाला अजयचा स्वरसाज

‘जोगवा’ नंतर ‘सोयरीक’ चित्रपटामुळे मला परत गोंधळ गाण्याची संधी मिळाली

soirik marathi movie ajay gogavale's gondhal song release
'सोयरीक' मधून पुन्हा गोंधळाला अजयचा स्वरसाज

मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये आपल्या संगीताने आणि आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारी संगीतकार जोडी म्हणजे अजय अतुल. सध्या नवरात्रैात्सवाची लगबग सुरु आहे. आदिमायेचा जागर करत तिच्या शक्तीची उपासना या दिवसात प्रत्येकजण करीत असतो. गायक संगीतकार अजय गोगावले पुन्हा एकदा त्याच्या दमदार आवाजातले गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आला असून त्याने यल्लमा देवीचा जागर करीत तिचा गोंधळ घातला आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या आगामी ‘सोयरीक’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी हा गोंधळ गायला आहे.

गोंधळाचे बोल

डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा

पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला, तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला

आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा, येल्लू आईचा उधं उधं…..

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, लल्लाटी भंडार असो अजय गोगावलेच्या आवाजतील ही गाणी ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. गोंधळाबद्दल बोलताना अजय म्हणाला की, ‘जोगवा’ नंतर ‘सोयरीक’ चित्रपटामुळे मला परत गोंधळ गाण्याची संधी मिळाली आहे. वैभव देशमुख यांनी हा लिहिला असून संगीतकार विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केला आहे. विजयसोबत याआधी काम केल्याने ‘मळवट’ या गोंधळासाठी छान ट्यूनिंग जमले आणि हा गोंधळ गातानासुद्धा खूप मजा आली.

कौटुंबिक धाटणी असलेला सोयरीक हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्यातल्या स्वार्थ अन निस्वार्थाची लढाई यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची ‘सोयरीक’ अवलंबून असते आणि तेच मांडायचा प्रयत्न ‘सोयरीक’ चित्रपटात करण्यात आला आहे.


हेही वाचा – Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच किर्तनकार शिवलिला यांनी मागितली माफी, म्हणाल्या…