करण जौहरने उडवली ऊर्फीची खिल्ली? काही लोक फक्त फोटो काढण्यासाठी…

करण जौहर म्हणतो की मला अशा लोकांकडे पाहून आश्चर्य वाटतं की, असे काही इंफ्लुएंसर्स आहेत जे तयार होऊन एअरपोर्टवर जातात, मीडियासोबत बोलतात, पण कधीच फ्लाइट पकडत नाहीत.

मागील काही दिवसांपासून करण जौहर त्याच्या नव्याने सुरू झालेल्या टॉक शोमुळे वारंवार चर्चेत असतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्याच्या कॉफी विथ करण शोमध्ये सोनम कपूर आणि अर्जुन कपूर पोहोचले होते. ज्यावेळी करणने त्यांच्यासोबत अनेक गप्पा मारल्या, मजामस्ती केली. दरम्यान, यावेळी बोलता बोलता करणने भारतातल्या अभिनेत्रींच्या फॅशनवरून देखील मस्करी केली.

दीपिकाला म्हणाला सर्वात स्टायलिस्ट
कान्स फेस्टिवलबाबत करणने सोनमला विचारलं की, तुला यावर्षीचा कान्स फेस्टिवल कसा होता असं वाटत? यावर सोनम त्यालाच विचारते की तुला कसा वाटला? करण म्हणतो ती मला इतका खास नाही वाटला. त्यानंतर सोनम त्याला विचारते की तुला काय वाटतं, सर्वात चांगले कपडे कोणी घातले होते? ज्यावर करण दीपिकाचं नाव घेतो.

काही लोक फक्त फोटो काढण्यासाठी एअरपोर्टवर जातात
त्यानंतर करण जौहर म्हणतो की मला अशा लोकांकडे पाहून आश्चर्य वाटतं की, असे काही इंफ्लुएंसर्स आहेत जे तयार होऊन एअरपोर्टवर जातात, मीडियासोबत बोलतात, पण कधीच फ्लाइट पकडत नाहीत.

करण जौहरला ऊर्फी जावेदने दिलं उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

खरंतर, असे प्रश्न अनेकदा ऊर्फीला विचारण्यात आले आहेत की ती तयार होऊन एअरपोर्टवर का जाते आणि एअरपोर्टच्या बाहेर फोटो का काढते. ज्यानंतर ऊर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणतेय की, “मी फिरेन…नाचेन, गाणं म्हणेन, हसेन, रडेन, खेळेन, बाहेर जाईन, एकटी जाईन, इतर कोणबरोबर जाईन, कुठेही जाईन…तुम्हाला काय करायचं आहे? शिवाय या व्हिडीओ खाली तिने कॅप्शन लिहिलंय की, तुला काय करायचंय भाऊ?”


हेही वाचा :अभिनेता प्रभासच्या ‘या’ नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; सोशल मीडियावर जोरदार चर्चा