HomeमनोरंजनNavri Mile Hitlerla : वल्लरी आणि विराजच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट !

Navri Mile Hitlerla : वल्लरी आणि विराजच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट !

Subscribe

जसं नवीन वर्ष काही न काही घेऊन येतं तसंच जाणारं वर्ष खूप काही देऊन ही जातं. मालिका विश्वातली सध्या प्रेक्षकांच्या मनात गाजत असलेली मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ मधली नायिका लीला म्हणजेच वल्लरी विराज ने 2024 वर्ष तिच्यासाठी किती खास होत हे व्यक्त करताना सांगितले.

“नवरी मिळे हिटलरलाचा पहिला प्रोमो 14 फेब्रुवरी 2024 ला आला होता, ती आठवण माझी या वर्षातली बेस्ट आहे कारण त्याच दिवशी माझ्यासोबत आणखीन छान गोष्टी घडल्या होत्या. माझ्या फिल्मचा ट्रेलर आणि गाणं ही रिलीज झाले होतं. माझ्यासाठी तो खूप मोठा दिवस होता. खरतर तो दिवस मला आता ही लक्षात आहे मी त्यादिवशी एका कामासाठी कुठेतरी बाहेर होते गाडीत प्रवास करत असताना मला झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवरून मेसेज आला होता आणि तो मेसेज होता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या पहिल्या प्रोमोचा. तो क्षण माझ्या स्मरणात सदैव राहील.

या व्यतिरिक्त 2024 मध्ये शूटिंग आणि प्रोमोशनच्या धावपळी मध्ये माझं तब्यतीकडे खूप दुर्लक्ष झालय,पण मी आता बदल घडवत आहे, हळूहळू करून वेळेवर जेवण, थोडा व्यायाम या गोष्टींकडे लक्ष देत आहे”. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील वसुंधरा म्हणजेच अक्षया हिंदळकर म्हणाली “2024 मध्ये मला बॉक्सिंग ट्रैनिंग पूर्ण करायचं होत पण ते राहून गेलं कारण शूटिंगमुळे वेळ नाही मिळाला. प्रयत्न करेन की नवीन वर्षात ते पूर्ण करेन . 2024 मध्ये माझी खूप जवळची व्यक्ती माझी आजी आम्हाला सोडून गेली. मला कायम एक गोष्टीची खंत राहील कि कामामुळे तिला हवा तसा वेळ देता आला नाही. तिला कुठे फिरायला घेऊन जाता आलं नाही. जर मला कुठची गोष्ट 2024 ची पुन्हा करता आली तर आजीला वेळ देऊन, तिच्यासोबत फिरायला जायला आवडेल. तिच्याकडे अधिक लक्ष देईन.

हेही वाचा : Year Ender 2024 : 2024 मध्ये या सेलिब्रिटींनी घेतले डिव्होर्स


Edited By : Prachi Manjrekar