काही वेळेस प्रेग्नंसी सुंदर नसते… सोनम कपूरची पोस्ट चर्चेत

सोनम तिच्या प्रेग्नंसीमधील अनेक अपडेट वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सोनमच्या प्रेग्नंसीचा हा शेवटचा महिना आहे. याचं महिन्यामध्ये सोनम तिच्या बाळाला जन्म देईल

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून सोनम कपूरच्या प्रेग्नंसीच्या चर्चा चालू आहेत. सोनम कपूर आई होण्यासाठी खूप आतुर झाली आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबामध्ये देखील बाळ्याच्या स्वागताची तयारी चालू झाली आहे. याचंदरम्यान, सोनमने तिच्या चाहत्यांना तिची तब्बेत ठिक नसल्याची माहिती दिली आहे. सोनमने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत एक कॅप्शन देखील दिलं आहे.

तब्बेत ठिक नसल्याची सोनमने दिली माहिती

सोनम तिच्या प्रेग्नंसीमधील अनेक अपडेट वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सोनमच्या प्रेग्नंसीचा हा शेवटचा महिना आहे. याचं महिन्यामध्ये सोनम तिच्या बाळाला जन्म देईल. दरम्यान, सोनमने काही नवीन अपडेट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने तिच्या सूजलेल्या पायांचा फोटो शेअर केला आहे. सध्या सोनमचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या फोटोव्यतिरिक्त सोनमने तिथे लिहिलंय की, ‘काही वेळेस प्रेग्नंसी सुंदर नसते’

या महिन्यात सोनम देणार तिच्या बाळाला जन्म
मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सोनमच्या प्रेग्नंसीचा हा शेवटचा महिना आहे. याच महिन्यामध्ये सोनम तिच्या बाळाला जन्म देईल. सोनम कपूर आणि आनंद आहूजाच्या पहिलं मुलाचा जन्म झाल्यानंतर पहिले ६ महिने सोनम आपल्या आई-वडीलांच्या घरी राहिल. त्यानंतर ती आपल्या पतीसोबत लंडनला जाईल. शिवाय सोनमकडे अनेक प्रोजेक्ट आहेत, प्रेग्नंसीनंतर सोनम त्यावर काम करणार आहे.


हेही वाचा :बिग बींच्या हेअरस्टाईलची परदेशात भुरळ