सोमी अलीने सलमान खानवर केला शारीरिक शोषण आणि सिगारेटचे चटके दिल्याचा गंभीर आरोप

एकेकाळी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री सोमी अलीने नुकत्याच एका पोस्टमधून अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये सलमानचे नाव कुठेही लिहिले नाही. परंतु तिने जे काही आरोप लिहिले आहेत. त्यामध्ये तिथे सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान तिला गुलाबाचे फुल देताना दिसत आहे. त्यानंतर सोमीने ही पोस्ट डिलीट देखील केली आहे.

परंतु या पोस्टमधून सोमीने लिहिलं होतं की, “त्याने फक्त भारतातच तिचे शो बंद केले नाही तर केस करण्याची धमकी देखील दिली आहे. सोमीने सलमान खानचे नाव न घेता त्याच्या सिगरेटने चटके दिल्याचा आणि शोषण केल्याचा आरोप केला आहे. सोमी अलीची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.”

सोमी अलीने पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की, “आता खूप काही होणार आहे. माझे शो भारतामध्ये बंद करण्यात आले आणि माझ्यावर केस करण्याची धमकी देखील देण्यात आली. तू खूप भित्रा माणूस आहेस. इथे माझं रक्षण करण्यासाठी 50 वकील उभे आहेत. तु जे मला अनेक वर्ष शारीरिक शोषण केलेस आणि मला सिगारेटने भाजलेस.” या सोबतच सोमीने अनेक शिव्या देखील या पोस्टमध्ये दिल्या आहेत. तसेच सलमानला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रींचा धिक्कार केला आहे.

कोण आहे सोमी अली?

सोमी अली पाकिस्तानमध्ये राहत होती. परंतु सलमानसाठी ती मुंबईमध्ये आली होती. इकडे आल्यानंतर सोमी अलीने सलमानसोबत एक चित्रपट केला. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करु लागले. सोमी अली आणि सलमान यांचे प्रेमसंबंध 1991 पासून ते 1998 पर्यंत होतं.त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. सलमानसोबत ब्रेकअपनंतर सोमी अली पुन्हा फ्लोरिडा निघून गेली. मात्र, त्यानंतर अजूनही सोमी अली सलमानवर अनेक आरोप करताना दिसून येते.

 


हेही वाचा :

पांढरे वस्त्र परिधान करून शाहरुखने मक्कामध्ये केलं उमराह