एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची ‘भाईजान’ला धमकी; म्हणाली, ‘एक दिवस तुझा भांडाफोड होणार’

सलमान खान आणि ऐश्वर्या रायसोबत रिलेशनशिपदरम्यान दोघांमध्ये अनेकदा वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यावेळी सलमान खानवर आरोप करण्यात आले की, तो दारूच्या नशेत ऐश्वर्याला मारहाण करायचा तसेच तिला फोनवरून धमक्या द्यायचा. मात्र सलमान खानने वेळोवेळी हे आरोप फेटाळून लावले.

Somy Ali Calls Out Harvey Weinstein of Bollywood’ by Using Salman Khans Silhouette Mentions Aishwarya Rai Bachchan Check Viral Post
एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची 'भाईजान'ला धमकी; म्हणाली, 'एक दिवस तुझा भांडाफोड होणार'

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांपेक्षा लव्ह लाईफमुळे सर्वाधिक चर्चेत असतो. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय या अभिनेत्रींसोबत सलमानच्या रिलेशलशीपच्या चर्चा रंगल्या. खासकरून ऐश्वर्या राय आणि सलमानच्या रिलेशनशिपची 90 च्या दशकात फार चर्चा झाली. पण ऐश्वर्यासोबतचे सलमानचे नाते फार काळ टिकलं नाही. सलमानने दारूच्या नशेत ऐश्वर्याला मारहाण केल्याची वृत्त समोर आले होते. यात आत सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हीने देखील सलमान खानवर असेच काहीसे आरोप केले आहेत. सोमी अलीने सोशल मीडियावर सलमानविरोधात एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने सलमानसोबतच्या नात्याबद्दल अनेक गंभीर खुलासे केले आहेत.

सोमीने तिच्या पोस्टमध्ये सलमान खान आणि भाग्यश्री यांच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील एक सीनचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीन शॉट शेअर करत सोमीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बॉलिवूडचा हार्वी वीन्सटीन, एक दिवस तुझाही भांडाफोड होणार आहे… तू ज्या महिलांवर अत्याचार केलेस, वाईट वागला, त्यांचे शोषण केलेस… त्या सर्वजणी दिवस समोर येत सत्य जगासमोर आणतील… जसे ऐश्वर्या राय बच्चन हिने केले होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

हार्वी वीन्सटीन हा हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहे. हार्वीविरोधात अनेक महिला आणि अभिनेत्रींनी लैंगिक शोषण, मारहाण, बलात्कार, धमक्या देणे आणि मारहाणीचे आरोप केले आहेत. यामध्ये लिसा कॅम्पबेल, एवा ग्रीन, ऐंजिलना जोली या प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे. या प्रकरणी हार्वी वीन्सटीनला न्यायालयाने 23 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

सलमान खान आणि ऐश्वर्या रायसोबत रिलेशनशिपदरम्यान दोघांमध्ये अनेकदा वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यावेळी सलमान खानवर आरोप करण्यात आले की, तो दारूच्या नशेत ऐश्वर्याला मारहाण करायचा तसेच तिला फोनवरून धमक्या द्यायचा. मात्र सलमान खानने वेळोवेळी हे आरोप फेटाळून लावले.

सोमी अली ही पाकिस्तानी वंशाची अमेरिकन नागरिक आहे. सोमी सलमान खान खूप आवडायचा आणि याच वेडापाई ती वयाच्या 16 वर्षी मुंबईत आली. दोघं रिलेशनशिपमध्ये देखील होते. मात्र काही काळातचं दोघांचं ब्रेकअप झाले आणि सोमी अमेरिकत परतली. सोमीने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता ती एक एनजीओ चालवतेय.


RRR Box Office Collection | आरआरआर सिनेमाने केला 100 कोटींचा गल्ला पार