घरमनोरंजनसलमानच्या विरोधात बोलल्यामुळे आली होती बलात्काराची धमकी; 'या' गायिकेचा खुलासा

सलमानच्या विरोधात बोलल्यामुळे आली होती बलात्काराची धमकी; ‘या’ गायिकेचा खुलासा

Subscribe

सलमान खानबद्दल वाईट बोलले तेव्हा मला सामूहिक बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.

गायिका सोना मोहापात्रा आपल्या वक्तव्यांमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, आता सोना महापात्राने पुन्हा एकदा मोठं विधान केलं असून यावेळी सलमान खानशी संबंधित आहे. एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर सोना मोहापात्राला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. वापरकर्त्याने म्हटलं आहे की, जेव्हा जेव्हा ते ट्विटरवर तिचं नाव शोधतात तेव्हा सर्वत्र हिंदूफोबिया दिसून येतो. वापरकर्त्याच्या या वक्तव्यावर सोनाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तसंच एक मोठा खुलासाही केला आहे.

ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला उत्तर देताना सोनाने लिहिलं, मी एक सार्वजनिक व्यक्ती आहे. मला २ वर्षांपूर्वी मुस्लिम संस्थेकडून धमकीदायक पत्रे मिळाली होती कारण मी एक गाणं गायलं होतं. जेव्हा मी सलमान खानबद्दल वाईट बोलले तेव्हा मला सामूहिक बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, सोना मोहापात्राची असं बोलण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आल्यावर तिने रांगोली चंदेललाही पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी तिने रांगोलीच्या वक्तव्याचा केवळ बचावच केला नव्हता तर तिचे ट्विटर हँडल निलंबित केल्याचंही तिने नाकारलं होतं.

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

This picture from the Press Conference launch event of my single #NeherWalePul (#linkinbio) . Had forgotten to pack any #jewellry & my sweetie & ace designer @sailexng came to the rescue getting me these pieces from a store next to his design studios in Shahpur Jaat in #Delhi . Saved me at the fashion stakes. ??? This was a music collaboration of an unusual kind. More about that later. Time to cook some lunch I say. #glamgirls #work #hard #lockdown2020 #India fights #covid_19 #ImWearing #designer @nachiketbarve #style #fashion #hmu & #photo @payalbalse #throwback #story #friends #who #help #savetheday

- Advertisement -

A post shared by ShutUpSona (@sonamohapatra) on


हेही वाचा – विराट-अनुष्काने घेतला एक दिवसाचा क्लास, पण शिकवलं काय?


कार्तिक आर्यन नविन टार्गेट

अलीकडेच सोना मोहापात्राने कार्तिक आर्यनला लक्ष्य केलं आहे. कार्तिकच्या टिक टॉक व्हिडिओवर तिने आक्षेप नोंदवला होता. या व्हिडिओमध्ये कार्तिकने आपल्या बहिणीने बनवलेली चपाती आवडत नसल्यामुळे त्याने तिला त्रास दिला. कार्तिकने तो व्हिडिओ गंमत म्हणून बनवला होता, परंतु सोनाने त्याला एक मोठा मुद्दा बनवला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -