सोनाक्षीचा झाला साखरपुडा पण पार्टनरचे नाव मात्र गुलदस्त्यात

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या रिंग फिंगरमध्ये डायमंड रिंग घातल्याचे दिसून येत आहे. ज्यावरून सोनाक्षीची एंगेजमेंट झाली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहेत. सोनाक्षीने अचानक शेअर केलेल्या या फोटोंमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सोनाक्षी दाखवतेय इंगेजमेंट रिंग

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तीन वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून एंगेजमेंटची बातमी सर्वांना दिली आहे. शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये सोनाक्षी एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे. तसेच प्रत्येक फोटोमध्ये सोनाक्षीच्या जोडीदाराने तिचा हात हातात घेतलेला आहे. मात्र अद्याप त्याचा चेहरा सोनाक्षीने दाखवलेला नाही.

सोनाक्षीने लिहिलंय की…

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षीने तिचा आनंद व्यक्त करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे. माझ्या सगळ्यात मोठ्या स्वप्नामधील एक स्वप्न पूर्ण होणार आहे आणि ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यापासून मी स्वतःला थांबू शकत नाही.

कोन आहे सोनाक्षीचा जोडीदार?


सोनाक्षीने जोडीदाराचे नाव अद्याप उघड केलं नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार हा दुसरा तिसरा कोणी नसून ‘नोटबुक’ फेम अभिनेता झहीर इक्बाल आहे. ज्यासोबत सोनाक्षीचे नाव बऱ्याच दिवसांपासून जोडले जात होते. बऱ्याच दिवसांपासून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र त्याबातम्यांवर आता शिक्का मोर्तब झाला आहे.


 हेही वाचा :दीपिका देणार गूड न्यूज, होणाऱ्या बाळाबद्दल रणवीर म्हणाला….