सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने दिली नात्याची कबुली; पोस्ट शेअर करून केला खुलासा

मागील काही दिवसांपूर्वी सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त जहीर इकबालने सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या नात्याची कबूली दिली होती. अशातच आता सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालच्या लग्नाची बातमी समोर येत आहे

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे सध्या सोनाक्षी सिन्हाचे अभिनेता जहीर इकबालसोबत असलेल्या खास नात्यामुळे सोनाक्षी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. खरंतर, मागील काही दिवसांपूर्वी सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त जहीर इकबालने सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या नात्याची कबूली दिली होती. अशातच आता सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालच्या लग्नाची बातमी समोर येत आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

जहीर इकबाल आणि सोनाक्षी सिन्हाच्या नात्याची बातमी समोर आल्यापासून चाहते सोनाक्षीच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एका इंटरव्यूमध्ये सोनाक्षीला लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सोनाक्षीने उत्तर दिले की, “माझं कुटुंब माझ्यावर कोणताही दबाव टाकत नाही, कारण त्यांना माहित आहे की, मी अजून काम करत आहे आणि ते काम खूप एन्जॉय सुद्धा करत आहे. मला आधी एक मुलगा शोधायला हवा, मगच मी लग्न करू शकेन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

मात्र दूसरीकडे जहीर इकबालने सोनाक्षीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी इंस्टाग्रामवर एक मजेशीर पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.त्यात खाली त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्चा सोना, थँक्यू तू मला मारलं नाहीस, आय लव यू”. तसेच या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोनाक्षी फ्लाइटमध्ये फास्टफूड खाताना दिसत आहे. जहीर इकबालच्या या व्हिडिओखाली, सोनाक्षीने लिहिले होते की, “थँक्यू , लव यू आणि मी तुला मारायला येत आहे.”


हेही वाचा :http://अभिनेत्री मलायका अरोराच्या घरी पोलीस; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण