Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन सोनाक्षी सिन्हाने मुंबईत खरेदी केला सी-फेसिंग फ्लॅट

सोनाक्षी सिन्हाने मुंबईत खरेदी केला सी-फेसिंग फ्लॅट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सोनाक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोनाक्षी सोशल मीडियावरुन तिचे अनेक नवनवीन फोटो शेअर करत असते. अशातच, सोनाक्षी तिच्या मुंबईतील नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत. हे घर आतून खूप सुंदर आहे. शिवाय या घराच्या आतील दृश्यापेक्षा बाहेरचे दृश्य अधिक सुंदर आहे.

सोनाक्षीने खरेदी केला सी-फेसिंग फ्लॅट

सोनाक्षी सिन्हाने यापूर्वी 2021 मध्ये वांद्रे येथे 4BHK घर खरेदी केले होते. अशातच आता तिने आणखी एक नवीन घर घेतले आहे. सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे सोनाक्षीने चाहत्यांना तिच्या नवीन घराची माहिती दिली आहे. सोनाक्षीचे नवीन घर खूपच सुंदर आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनाक्षीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. शिवाय घरामध्ये नवीन फर्निचर सेट देखील दिसत आहे.

- Advertisement -

हे फोटो शेअर करत सोनाक्षीने खाली लिहिलंय की, “खूप कठीण, झाडे, भांडी, दिवे आणि गाद्या आणि प्लेट्स आणि कुशन आणि खुर्च्या आणि टेबल, काटे आणि चमचे, सिंक आणि डब्यांसोबत डोकं फिरवलं आहे, घर बांधणे सोपे नाही” सोनाक्षीचे हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावर कमेंट करून यूजर्स तिचे घरासाठी अभिनंदन करत आहेत.

 


हेही वाचा :

रणवीर सिंह झळकणार हॉलिवूडमध्ये; विलियम मॉरिस एंडेव्हरसोबत केला करार

- Advertisment -