बॉलीवूडची दबंग गर्ल अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी ती या माध्यमातून शेअर करताना दिसते. शिवाय सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. अशातच आता सोनाक्षी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी तिच्या चर्चेत येण्याचं कारण मात्र वेगळं आहे. नुकतेच अभिनेत्रीने तिचे मुंबईतील घर विकल्याचे समजत आहे. या व्यवहारातून तिने कोट्यवधी रुपयांचा नफा कमावल्याचे समजत आहे. (Sonakshi Sinha sold Bandra property)
सोनाक्षीने विकलं मुंबईतलं घर
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचं मुंबईतलं घर विकल्याचे समजत आहे. स्क्वेअर यार्ड्सच्या माध्यमातून याबाबतची माहिती शेअर करण्यात आली आहे. सोनाक्षीच्या खासगी मालमत्तेबद्दल सोमवारी एका निवेदनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. त्यानुसार, सोनाक्षीने हे घर विकून तब्बल 61 टक्के इतका नफा कमावल्याचे समजत आहे. या निवेदनात सांगितल्याप्रमाणे, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचं घर तब्बल 22.50 कोटी रुपयांना विकलं आहे. जे वांद्रे पश्चिम येथील एमजे शाह ग्रुप 81 ऑरिएट प्रोजेक्टमध्ये आहे. मुख्य म्हणजे, या परिसरात अनेक सेलिब्रिटी मंडळी राहतात. ज्यामध्ये सुनील शेट्टी, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणसारख्या मोठमोठ्या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.
अभिनेत्रीला झाला इतक्या कोटींचा नफा
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे घर एमजे शाह ग्रुप 81 ऑरिएट प्रोजेक्टमध्ये होते. हा प्रोजेक्ट एकूण 4.48 एकरमध्ये पसरलेला आहे. ज्यात अनेक 4 बीएचके घरांचा समावेश आहे. सोनाक्षीने याच भागातील घराची विक्री केली असून त्याचा कार्पेट एरिया 391.2 वर्ग मीटर म्हणजेच साधारण 4,211 वर्ग फूट इतका आहे. तर बांधकामाचा परिसर 430.32 वर्ग मीटर अर्थात जवळपास 4,632 वर्ग फूट इतका आहे. या प्रोजेक्टमध्ये 3 कार पार्किंगची सुसज्ज सुविधा उपलब्ध आहे.
या व्यवहारासाठी 30 हजार रुपये नोंदणी शुल्क आणि 1.35 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले होते. सोनाक्षीने 2020 मध्ये हे घर घेतलं होतं. त्यावेळी खरेदीसाठी तिने 14 कोटी रुपये मोजले होते. पण आता याच घराची विक्री तिने 22.50 कोटी रुपयांना केली आहे. म्हणजेच अभिनेत्रीला 8.50 कोटी रुपयांचा नफा झाला. या व्यवहारातून सोनाक्षीला खरेदी किमतीच्या 50 टक्क्यांहून जास्त असा एकूण 61 टक्के नफा झाला आहे.
सोनाक्षीची मालमत्ता
सोनाक्षी सिन्हाने ज्या भागातील घर विकलं त्याच ठिकाणी अभिनेत्रीचं आणखी एक घर आहे. ज्याची खरेदी तिने 2023 मध्ये 11 कोटी रुपयांना केली होती. त्यामुळे अभिनेत्रीच्या एकूण मालमत्तेबद्दल बोलायचं झालं तर, सोनाक्षी आणि तिचा पती झहीर इक्बाल यांच्याकडे 100 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ज्यात महागड्या घरांचा तसेच लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 1.42 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ (S350), 87.76 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ (GLS 350d) आणि 75.90 लाख रुपयांची BMW 6 GT देखील आहे.
हेही पहा –
Bollywood Upcoming Movies : फेब्रुवारी कोणाचा? 4 सिनेमे आमने सामने, 2 स्टारकिड्सची ग्रँड लॉन्चिंग