सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार ; खान कुटूंबाची सून होणार ?

Sonakshi Sinha to get married; Will Salman Khan's family have a daughter-in-law?
सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार ; खान कुटूंबाची सून होणार ?

दिवाळीनंतर तुळशीचे लग्न आटोपल्यानंतर लग्नाच्या सनई वाजायला सुरुवात होते. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतही लग्नसराईला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधील नुकतेच राजकुमार राव-पत्रलेखा आणि अनुष्का रंजन-आदित्य सील यांचा विवाहसोहळा पार पडला. विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची तयारी सुरू असून, पुढच्या आठवड्यात लग्न होणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चाही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आता लग्नाच्या या यादीत आणखी एका मोठ्या अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे ते म्हणजे बॉलीवूडची रज्जो आणि दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा. सोनाक्षी खान कुटूंबाची सून होणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर होत असून, सोनाक्षी नक्की कोणाशी लग्न करणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सलमान खानच्या कुटुंबातील सदस्याच्या खूप जवळ आहे. सोनाक्षी सलमानच्या कुटुंबातील बंटी सचदेवा या सदस्याशी रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होत आहे. सोनाक्षी बंटीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. बंटी हा सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानचा मेहुणा आहे. सोनाक्षी आणि बंटीची खूप चांगली मैत्री आहे. दोघांना अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र स्पॉटही करण्यात आले आहे. सोनाक्षी सिन्हा आणि बंटी सचदेवा यांचे नाते खूप चांगले आहे. सोनाक्षीने एका मुलाखतीत बंटीचे खूप कौतुक केले होते आणि त्याला सेल्फ मेड मॅन म्हटले होते. सोनाक्षी सिन्हा आणि बंटी सचदेवा लवकरच साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा सरु असून, अजूनपर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही.मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी सोशल मिडियावर धूमाकूळ घातला आहे.


हे ही वाचा – ‘किंग जेडी’चं ‘मैदान मार’ नवं गाणं रिलीज