‘अप्सरा’ झाली कोल्हापूरची सून, राजकीय नेत्याशी सोनालीने केलं लग्न ?

सोनालीच्या एका व्हिडिओमुळे सगळीकडे पुन्हा तीच्या लग्नाचीच चर्चा आहे. सोनालीने कोल्हापूरच्या एका राजकीय नेत्याशी लग्न केलं याचीच चर्चा सूरू आहे. कलाकारांची लग्न हा तर त्यांच्या फॅन्सचा सर्वात आवडीचा विषय असतो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं लग्न ही बाब देखील काही वर्षांपूर्वी चर्चेचा विषय बनली होती. याबाबत अनेक वर्षांनतर सोनालीने पॉडकास्टचा वापर करत भाष्य केले आहे.  लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पॉडकास्टचा वापर केला आहे. ती दररोज वेगवेळ्या गोष्टी चाहत्यांसमोर आणते.

या पॉडकास्टमध्ये शुक्रवारी तिने तिच्या लग्नाची गोष्ट सांगितली. ‘माझं कोणत्याही राजकीय नेत्याशी लग्न झालेलं नाही’, हे स्पष्ट करत असतानाच सोनालीने लग्नाबाबत तिची कोणती स्वप्नं आहेत, याबद्दलही सांगितलं.

सोनाली म्हणते…

‘क्लासमेट्स’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना माझं लग्न झालं अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मी संपूर्ण स्टारकास्टसोबत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. कोल्हापूरच्या एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाशी माझं लग्न झालं, अशी ती बातमी होती. आम्ही सगळेजण ती बातमी वाचून हसलो,  कारण त्यात तथ्य काहीच नव्हतं. अफवा समजून मी त्याकडे दुर्लक्षसुद्धा केलं. मात्र काही दिवसांनी मला माझ्या सख्ख्या चुलत बहिणीचा फोन आला. ती माझ्या लग्नाबद्दल विचारत होती. तेव्हा मला समजलं की ही अशीच पसरणारी साधी अफवा नाही. माझा मित्र सुशांत शेलारला मी याबद्दल माहिती काढण्यास सांगितलं. कारण सुशांतचे बरेच राजकीय संपर्क आहेत. त्याने थोडीफार माहिती काढली तेव्हा समजलं की कोल्हापूरच्या एका विरोधी पक्षाने त्या संबंधित राजकीय नेत्याची प्रतिमा मलिन व्हावी यासाठी अशा लग्नाच्या बातम्या पसरवल्या होत्या. मात्र यात माझं नाव का गोवण्यात आलं हे मला आजपर्यंत पडलेलं कोडं आहे.” या सर्व अफवांचा खूप त्रास झाला पण कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे मी यातून सावरू शकले.

या चार पद्धतीने करायचं आहे लग्न

आपल्या राजकीय लग्नाबद्दल सांगितल्यानंतर सोनालीने तीला चार पध्दतीने लग्न करायचं आहे हे ही सांगितलं. सोनाली म्हणाली, आई पंजाबी असल्याने पंजाबी पद्धतींनुसार, महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार, ख्रिश्चन लग्नाबद्दल विशेष आकर्षण असल्याने त्या पद्धतीनुसार आणि होणाऱ्या जोडीदाराची जी पसंत असेल त्यानुसार लग्न.. अशा चार पद्धतींनुसार लग्न करण्याचं स्वप्न आहे.


हे ही वाचा – क्वारंटाईन सेंटरमधून पळाला आणि त्याने घरी येऊन पत्नीचा हातच कापला, कारण….