घरमनोरंजनमराठमोळी अप्सरा आता 'साऊथ'मध्ये झळकणार!

मराठमोळी अप्सरा आता ‘साऊथ’मध्ये झळकणार!

Subscribe

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ करते. मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने चाहत्यांना गिफ्ट दिले आहे. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता साऊथमध्ये अदाकारी दाखवण्यास सोनाली सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली आता साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. सोनाली कुलकर्णी ही सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

- Advertisement -

‘मलाइकोट्टाई वालिबान’ मधील सोनालीचा लूक आला समोर

या चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. सोनाली आपल्या मनमोहक नृत्याने दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार. महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातही गाजवणार आहे.

- Advertisement -

सोनालीचा पहिला ‘मल्याळम’ चित्रपट

सोनाली कुलकर्णी म्हणते, “हा माझा पहिलाच मल्याळम भाषेतील चित्रपट आहे, या चित्रपटात दिग्गज लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. या गाण्याच्या माध्यमातून माझा लूक लोकांसमोर आला आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नडमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या पुढील आठवड्यात हिंदी भाषेत येणार आहे.

“हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -