घरमनोरंजनअभिनेत्री सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सर

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सर

Subscribe

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. सोनाली बेंद्रेनं आपल्या ट्विटरवरून स्टेटमेंट देत ही माहिती दिली आहे.

 

अभिनेता इरफान खानला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आता बॉलीवूडला अजून एक धक्का बसला आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. सोनाली बेंद्रेनं आपल्या ट्विटरवरून स्टेटमेंट देत ही माहिती दिली आहे. ४३ वर्षीय सोनाली बेंद्रे सध्या हायग्रेड कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असून आपल्यासह आपलं कुटुंब आणि जवळचा मित्रपरिवार असल्याचंही तिनं आपल्या स्टेटमेंटमध्ये नमूद केलं आहे. या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देण्याची आपली तयारी असल्याचंही तिनं म्हटलं आहे.

- Advertisement -

शोच्या चित्रीकरणात व्यस्त

सोनाली सध्या ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रियालिटी शो चं चित्रीकरण करण्यात व्यस्त होती. ती या शो मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. मात्र आता तिच्या या आजारामुळं तिला न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी थांबावं लागणार आहे. या आजाराशी सोनाली झुंज देत असून आपण आशावादी असल्याचं स्टेटमेंटमधून सांगितलं आहे.

कोण आहे सोनाली बेंद्रे?

सोनाली बेंद्रेनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. १९९४ मध्ये तिनं ‘आग’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र चित्रपटसृष्टीत जरी ती आपला ठसा उमटवू शकली नसली तरीही या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिनं प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केलं आहे. २००२ मध्ये निर्मात गोल्डी बहलसोबत तिनं लग्न करून संसार थाटला. तिला रणवीर नावाचा एक मुलगा असून सोनाली नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली आहे. मराठीमध्ये आजही तिचं ‘छमछम करता है’ गाणं अतिशय प्रसिद्ध आहे. सोनालीनं आपल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास ३० हिंदी चित्रपट केले आहेत. त्याशिवाय तिनं तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मराठी चित्रपटांतदेखील काम केलं आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटात सोनालीनं शेवटचं काम केलं होतं. त्यानंतर मात्र ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -