घरमनोरंजनअभिनेत्री सोनाली बेंद्रेने दिला भावनिक संदेश

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने दिला भावनिक संदेश

Subscribe

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यातून तिने इंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या मुलांना भावनिक संदेश दिला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कर्करोगाचा आजार झाला असून सध्या ती परदेशात यावर उपचार घेत आहे. सोनालीला हायग्रेड मेटॅस्टटीक कँसर झाला असून ती न्यूयॉर्कमध्ये आहे. मात्र वेळोवेळी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. वारंवार इंस्टाग्रामवर ती व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असते. तिने आपल्या आजाराची माहितीही सोशल मीडियवरून दिली होती. आता तिने इंडियाज बेस्ट ड्रामेबाजमधील बालकलाकार सदस्यांसाठी एक भावनिक संदेश दिला आहे. हा संदेश व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

सोनालीने सोडला होता शो 

४ जुलै रोजी सोनालीने आपल्याला कँसर असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती उपचारासाठी अमेरिकेला गेली. त्यापूर्वी ३० जून रोजी सोनालीने इंडियाज बेस्ट ड्रामेबाज शोच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या शोमध्ये सोनाली परिक्षकाच्या भूमिकेत होती. सोबत अभिनेता विवेक ऑबेरॉय आणि दिग्दर्शक उमंग कुमार देखील होते. मात्र मधूनच आपण हा शो सोडत असल्याचे तिने सांगितले. त्या जागी अभिनेत्री हुमा कुरैशी परिक्षकांच्या रुपात आली. मात्र आता सोनालीने या शोमधील मुलांकरता एक भावनिक संदेश दिला आहे.

 

View this post on Instagram

 

#sonalibendre sends a heartfelt message to the kids of #indiasbestdramebaaz ?@viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

- Advertisement -

सोनालीने दिला हा संदेश

इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या शोमधील मुलांना संदेश देताना सोनालीने म्हटले आहे की, ‘कधी अपयश येणार, कधी यशस्वी होणार, जिंकणं-हरणं हे आयुष्यात होतच राहतं, जिंकणं आणि हरण महत्त्वाच नसतं, महत्त्वाच आहे ते सहभाग घेणं, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेत सहभागी होता. तेव्हा तुम्ही रिस्क घेता. जी मुला रिस्क घेतात, ती आयुष्यात पुढे जातात. नवीन काही तरी शिकतात.’ हे सर्व सांगताना सोनाली खुपच भावूक झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -