Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अखेरचा तुला दंडवत... दीदींच्या जाण्याने सोनाली कुलकर्णी भावूक

अखेरचा तुला दंडवत… दीदींच्या जाण्याने सोनाली कुलकर्णी भावूक

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच सुलोचना दीदी यांचे काल (4 जून) निधन झाले. सुलोचना दीदी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शनिवारी (3 जून) सुलोचना दीदी यांची तब्येत अचानक बिघडली होती, त्यानंतर तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुलोचना दीदी यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सोनाली कुलकर्णी झाली भावूक

सुलोचना दीदी यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गज शोक व्यक्त करत आहेत. नुकतीच एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हळहळ व्यक्त केली आहे. यात सोनालीने सुलोचना दीदींचा एक फोटो शेअर करत “अखेरचा हा तुला दंडवत” अश्या भावूक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

- Advertisement -

सोनाली व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी देखील दीदींच्या आठवणीत भावून होऊन प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “दीदी प्रत्येक भूमिका जगल्या, बाई जितक्या गोड दिसायच्या तितकंच त्यांचं बोलणंही गोड होत. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. त्या नाहीत यावर माझा विश्वास बसत नाही. त्यांच्या जाण्याची बातमी खूप धक्का देणारी नाही. चित्रपटसृष्टीत मोळी पोकळी निर्माण झाली आहे. माझ्याकडून त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.”

- Advertisement -

मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी देखील फेसबुकवरुन मोठी पोस्ट शेअर करत सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

 


हेही वाचा :सुलोचना दीदींच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा; अमिताभ, धर्मेंद्र झाले भावूक

- Advertisment -