घरमनोरंजनSonali Kulkarni: सोनाली कुलकर्णीने सांगितला मल्याळी चित्रपटातील अनुभव, म्हणाली 'पहिल्याच सिनेमात...'

Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णीने सांगितला मल्याळी चित्रपटातील अनुभव, म्हणाली ‘पहिल्याच सिनेमात…’

Subscribe

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ करते. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता साऊथमध्ये अदाकारी दाखवण्यास सोनाली सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित “मलाइकोट्टाई वालिबान” या चित्रपटातून सोनाली आता साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. सोनाली कुलकर्णी ही सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सोनालीने मोहनलाल यांच्यासोबतचा अनुभव शेअर केला आहे.

असंख्य मल्याळम सिनेमा पाहिलेल्या या अप्सरेचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी जुनं नातं आहे. मल्याळम चित्रपट ‘शटर’ (२०१२) आणि ‘क्लासमेट्स’ (२००६) या चित्रपटांचे जेव्हा मराठीत रिमेक करण्यात आले, तेव्हा सोनालीनेच यात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या दोन्ही चित्रपटांतील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. त्यामुळे तिचं मल्याळम चित्रपटांबरोबरचं नातं अधिक घट्ट झालं.

- Advertisement -

मराठी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भरपूर साम्य आहे. माझा आगामी सिनेमा ‘मुघल मर्दानी छत्रपती ताराराणी’ चे शूटींग करत असताना मला कॉल आला. मल्याळम सिनेमातील सुपरस्टार मोहनलाल आणि लिजो जोस यांनी चित्रपटासाठी माझी निवड केली हे ऐकूनच मला खूप आनंद झाला. अनेक कॉल्सनंतर हे खरे असल्याची मी चौकशी केली. यासाठी मी मराठीतील अभिनेता आणि माझा मित्र सिद्धार्थ मेननशी बोलल्याचे ती सांगते.

मल्याळम भाषा शिकण्यासाठी सर्वात कठीण भाषा आहे. त्यामुळे ती भाषा शिकण्याचा माझ्यावर दबाव होताच. डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे कोची येथे झालेल्या वर्कशॅापदरम्यान मी डायलॅाग आणि स्क्रिप्टवर लक्ष केंद्रीत केले होते. मी मल्याळम अभिनेत्री नसल्याने माझे उच्चार टायमिंग आणि एक्सप्रेशन या सगळ्याच गोष्टीकडे  लक्ष देत होते. भाषा ही कलाकाराची महत्वाची भूमिका असते. तेव्हा स्क्रिप्ट लक्षात ठेवून भाषेवर लक्ष केंद्रीत केले असं तिने सांगितले.

- Advertisement -

मी जेव्हा शुटींगच्या वेळी माझ्या पहिल्या डायलॅागची तयारी केली. मोहनलाल सरांसोबत तो कठीण सीन शूट होणार होता. पण त्यानंतर अवघ्या काही तास आधीच दिग्ददर्शक लिजो यांनी सीन पुन्हा लिहायचे ठरवले. हे माझ्यासाठी धक्कादायक होते. अचानक स्क्रिप्टमध्ये बदल झाला आणि पुन्हा नवीन सीन आला. याने मला पॅनिक व्हायला झालं. पण त्या सीनचं शूट सिंगल टेकमध्ये अगदी सुंदर झालं.

या घटनेमधून लिजो जोस यांचे अभिनेत्याला अचानक धक्का देण्याचे तंत्र माझ्या लक्षात आले. त्यावेळी वेगळ्या अॅडवेंचर आणि जादुई दिग्दर्शनाचा अनुभव घेतल्याचेही ती सांगते.

हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नडमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या पुढील आठवड्यात हिंदी भाषेत येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -