Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन Viral Video: वडिलांना पाहताच सोनम कपूरला एअरपोर्टवरच कोसळले रडू

Viral Video: वडिलांना पाहताच सोनम कपूरला एअरपोर्टवरच कोसळले रडू

सोनम कपूर एअरपोर्टवर येताच आपल्या वडीलांना म्हणजेच अभिनेता अनिल कपूरला पाहून रडू कोसळले आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची मोस्ट फॅशनेबल ॲन्ड स्टायलिश वूमन म्हणून ओळखली जाणारी आभिनेत्री सोनम (Sonam Kapoor) कपूर सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे स्टयलिश मेकअप व्हिडिओ पोस्ट करताना दिसते. सोनमचे प्रत्येक व्हिडिओ तुफान व्हायरल देखील होतात. पण बॉलिवूडच्या मस्सकलीचा चक्क एरपोर्टवर रडतांनाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनम कपूर एअरपोर्टवर येताच आपल्या वडिलांना म्हणजेच अभिनेता अनिल कपूरला पाहून रडू कोसळले आहे. सोनमला रडू कोसळण्यामागचे कारणही तसेच आहे सोनमने तब्बल एका वर्षांनंतर भारतात पाऊल ठेवलं आहे.सोनम कपूर गेले अनेक दिवसांपासून लंडनमध्ये पती आनंद अहुजासोबत राहात होती. कोरोना व्हायसच्या परिस्थिती आणि पतीचा बिझनेस यामुळे ती लंडनमध्येचं राहिली होती. दोघां बाप-लेकिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. नेटकऱ्यांनी तर सोनमला फक्त पब्लिसिटी साठी नाटक करत असल्याचे कमेंट करत तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. तर अनेक युजर्सने सोनम प्रेग्नेंट आहे का? अशी कमेंट केली आहे.

व्हिडिओ पाहा-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

विरल भयानी यांनी अभिनेत्री सोनम कपूरचा हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इंन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सोनम कपूर आपल्या वडीलांना पाहताच अगदी लहान मुलीप्रमाणे धावत-धावत बाबा म्हणून हाक मारत अनिल कपूर यांच्या जवळ जाऊन त्यांची गळाभेट घेतांना दिसत आहे. इतकंच नाही तर सोनम एअरपोर्ट लूकमध्ये अत्यंत स्टायलिश अंदाजात दिसत होती.- Advertisement -

हे हि वाचा  – ‘कोण होणार करोडपती’ मध्ये कर्मवीर म्हणून खेळणार नाना पाटेकर! 

- Advertisement -