मला खात्री आहे ‘देवी’ तुम्हाला… बिपाशा आणि करणच्या मुलीसाठी सोनम कपूरने पाठवलं पत्र

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर 12 नोव्हेंबर 2022 रोजी आई-बाबा झाले. बिपाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 2016 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या जवळपास 6 वर्षानंतर बिपाशा आणि करण आई-बाबा झाले. त्यामुळे सध्या दोघेही खूप खूश आहेत. दरम्यान, अभिनेत्री सोनम कपूरने देखील बिपाशा आणि करणच्या मुलीसाठी छान गिफ्ट पाठवलं आहे.

बिपाशाने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये एका रिबेन आणि फुग्यांनी सजवलेलं गिफ्ट दिसत आहे. शिवाय या गिफ्टच्या हॅम्परवर छान मॅसेज लिहिला आहे. ज्यात लिहिलंय की, “प्रिय बिप्स आणि करण तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. एक मुल एक आर्शिवाद आहे आणि मला खात्री आहे की ‘देवी’ तुम्हाला खूप जास्त देईल.” सोनम, आनंद आणि वायू.


या स्टोरीमध्ये बिपाशाने आभार मानत लिहिलंय की, ‘थँक्यू सोनंम, आनंद आणि वायू’, देवी ला गे गिफ्ट खूप आवडलं.

2016 साली झालं बिपाशा-करणचं लग्न
बिपाशाने 2001 मध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अजनबी’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले होते. याशिवाय बिपाशा बसूने ‘राज’, ‘रक्त’, ‘फूटपाथ’, ‘ऐतबार’सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने शेवटचे 2015 मध्ये ‘अलोन’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर दिसला होता. तिथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. बिपाशासोबतचे हे त्याचे तिसरे लग्न आहे.


हेही वाचा :

ब्लॉगमधून अमिताभ यांनी विक्रम गोखले आणि तबस्सुमच्या आठवणींना दिला उजाळा