घरताज्या घडामोडीसोनम कपूरच्या घरी रंगला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, पहा फोटो

सोनम कपूरच्या घरी रंगला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, पहा फोटो

Subscribe

सोनम तिच्या भावंडासोबत खूप खुश दिसून आली.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कपूर (sonal kapoor) काही दिवसांपूर्वीच भारतात परतली आहे. सोनल भारतात येताच ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलेय. गेल्या अनेक दिवसांपासून सोनमच्या अनेक फोटोंमधून ती प्रेग्नंट असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सोनमचे याविषयी कोणताही खुलासा केला नव्हता. मात्र सोनमच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलेले असताना दुसरीकडे कपूर घरातून डोहाळेजेवणाचे फोटो समोर आले आहेत. मात्र हे फोटो सोनमच्या डोहाळेजेवणाचे नसून तिच्या वहिनीचे अंतरा मोतिवाला (Antara Motiwala) हिच्या डोहाळे जेवणाचे आहेत. कपूर घरातील सुनेच्या डोहाळे जेवणाचे फोटो सध्या सोनम आणि अर्जुन कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(sonam kapoor share bhabhi antra motiwala baby shower photo)

- Advertisement -

सोनम कपूरचा भाऊ मोहित मारवाह आणि त्याची पत्नी अंतरा मोतीवाला दोघेही लवकरच आई वडिल होणार आहेत. अंतराच्या डोहाळे जेवणाच्या समारंभासाठी संपूर्ण कपूर कुटुंबिय एकत्र आले होते. ज्यात अभिनेता अर्जुन कपूर,सोनम कपूर आणि संपूर्ण कपूर कुटुंबातील भावंडे एकत्र आल्याचे पहायला मिळत आहे. या फोटोंवरुन आता सोनम प्रेग्नंट नसल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

- Advertisement -

वहिनीच्या डोहाळे जेवणाच्या समारंभाला पेस्टल ग्रीन रंगाच्या ड्रेस घातला होता. सोनम तिच्या भावंडासोबत खूप खुश दिसून आली.

नुकतेच सोनमच्या बहिणीचे लग्नही पार पडले. अगदी साध्या पद्धतीने सोनमच्या बहिणीचे लग्न झाले. यावेळी देखील सोनम प्रेग्नंट असल्याच्या चर्चे केल्या जात होत्या.


हेही वाचा – KBC13च्या यंदाच्या पर्वामध्ये झाला महत्वपूर्ण बदल, फास्टेस फिंगर फर्स्ट पर्याय होणार गायब

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -