‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींकडून ज्वेलरी घालण्याच्या घ्या टीप्स

sonam kapoor to vidya balan this is how you can style your silver jewellery
'या' बॉलिवूड अभिनेत्रींकडून ज्वेलरी घालण्याच्या घ्या टीप्स

सध्या सिल्वर ज्वेलरीची फॅशन फारच लोकप्रिय झालेली आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री सध्या सिल्वर ज्वेलरी घालताना दिसत आहेत. अंगठी, नेकलेस किंवा कानातले असो सिल्वर ज्वेलरीला बॉलिवूड अभिनेत्री पहिली पसंती देत आहेत. सिल्वर ज्वेलरीतील या अभिनेत्रीचा लूक फारच सुंदर आहे. सिल्वर ज्वेलरी जास्त महाग नसतात. त्यामुळे तुम्ही देखील बॉलिवूड अभिनेत्रीप्रमाणे लूक करू शकता. त्यामुळे या बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स.

चित्रांगदा सिंह

या फोटोमध्ये चित्रांगदा पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या साडीत दिसत आहे. तिने या लूकला पूर्ण करण्यासाठी सिल्वर नेकलेस घातला आहे.

सोनम कपूर

सोनमला सिल्वर ज्वेलरी फार आवडतात. त्यामुळे ती खूप वेळा सिल्वर ज्वेलरीमध्ये दिसली आहे.

आदिती राव हैदरी

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी खूप वेळा सिल्वर कानातल्यामध्ये दिसून आली आहे. मात्र या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने सिल्वरच्या बांगड्या आणि ब्रेसलेट घातलं आहे.

विद्या बालन

सिल्वर ज्वेलरीची जेव्हा चर्चा होते तेव्हा अभिनेत्री विद्या बालनला विसरून चालणार नाही. तिला सिल्वर ज्वेलरी घालायला खूप आवडते. विद्या बालनच्या सिल्वर नथीबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते.

सयानी गुप्ता

नुकतचं अभिनेत्री सयानी गुप्ताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती हिरव्या रंगाच्या साडीत दिसत आहे. या साडीसोबत तिने सिल्वर चोकर सेट आणि सिल्वर लाँग नेकलेस घातला आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.


हेही वाचा – Sooryavanshi Trailer : ‘पोलीस धर्म बघून नाही तर क्रिमीनल रेकॉर्ड बघून ठोकतात’