घरताज्या घडामोडीSonam Kapoor चा कोट्यधीश पती वादाच्या भोवऱ्यात ; आनंद आहुजावर टॅक्स चोरीचा...

Sonam Kapoor चा कोट्यधीश पती वादाच्या भोवऱ्यात ; आनंद आहुजावर टॅक्स चोरीचा आरोप

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)  हिचा कोट्याधीश पती आनंद आहुजा (Anand Ahuja) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आनंद आहुजा हा एक प्रसिद्ध बिझनेसमन असून, आता तो फसवणुकीच्या प्रकरणात अडकला आहे. सोनम कपूरच्या पतीने टॅक्स आणि कस्टम ड्यटी वाचवण्यासाठी कथितरित्या सर्व कागदपत्रांमध्ये बदल केले, असे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)  हिचा कोट्याधीश पती आनंद आहुजा (Anand Ahuja) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आनंद आहुजा हा एक प्रसिद्ध बिझनेसमन असून, आता तो फसवणुकीच्या प्रकरणात अडकला आहे. सोनम कपूरच्या पतीने टॅक्स आणि कस्टम ड्यटी वाचवण्यासाठी कथितरित्या सर्व कागदपत्रांमध्ये बदल केले, असे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. आनंद आहुजावरील हे फसवणुक केल्याचे आरोप एका आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीने केले आहेत.

जानेवारी महिन्यात आनंद आहुजाने केलेले ट्विट मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं. त्याच्या ट्विट्मध्ये असे लिहिले होते की, ‘कोणी आंतरराष्ट्रीय कंपनी माययूएसच्या संपर्कात आहे का? कारण त्यांच्या शिपमेंटमध्ये उशीर होत आहे. मला यामुळे भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागतं आहे. ही आंतरराष्ट्रीय कंपनी चुकीच्या पद्धतीने सामान जप्त करत असून, औपचारिक कागदपत्रांच्या कारवाईला नकार देत आहे.

- Advertisement -

आनंदच्या ट्विटनंतर कंपनीने सोशल मिडियावर काही मर्यादा असल्यामुळे चॅट आणि इमेलद्वारे संपर्क करण्याचा सल्ला दिला. यावर आनंदने रिप्लाय केला की, या सर्व गोष्टी मागच्या 7 दिवसांत करुन झाल्या असल्याचं म्हटलं होतं. यासोबत त्यानं ही आंतरराष्ट्रीय कंपनी घोटाळा करत असल्याचंही म्हटलं होतं.

- Advertisement -

या सर्व प्रकारानंतर संबंधित कंपनीने फेब्रुवारीत आनंद आहुजाच्या ट्वीटवर उत्तर दिलं. त्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, आनंद आहुजाच्या सेवांमध्ये कोणत्याही समस्या नाही तर त्यामध्ये आहुजाने दिलेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे कंपनीने आरोप केले. आहुजाने सामानाबरोबरच टॅक्स म्हणून दिलेली रक्कम ही 90 टक्क्यांनी कमी असल्याचं स्पष्ट केलं होतं.

यानंतर आनंद आहुजाने ट्विट केलं आहे की, ‘आता मी माझं सामान काढून घेतलं आहे आणि माझं अकाउंट बंद केले आहे. या फसवणुकीच्या आरोपामुळे सोशल मिडियावर सोनम कपूरचा कोट्याधीश पती आनंद आहुजा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.


हे ही वाचा – लता मंगेशकरांमुळे शक्ती कपूर यांच्या चुका माफ, अभिनेत्याने मंगेशकर कुटुंबासोबतच्या नात्याचा सांगितला ‘किस्सा’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -