Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन सोनम कपूरचा मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सोनम कपूरचा मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आई झाल्यापासून चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर झाली आहे. आगामी काळात सोनम चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा पदार्पण करणार असल्याच्या अनेक बातम्या समोर येतात. मात्र, याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, अशातच सोनमचा पती आनंद आहुजाने सोनम मुलगा वायूचा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून अनेकजण फोटोवर कमेंट्स करु लागले आहेत.

सोनम कपूरचा मुलासोबतचा फोटो व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by anand s ahuja (@anandahuja)

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या कुटुंबासोबत फॅमिली टाईम स्पेंड करताना दिसते. सोनम कपूर अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम वरून तिच्या मुलाचे आणि पतीसोबतचे फोटो शेअर करत असते. अशातच, सोनम कपूरचा पती आनंद आहुजाने मुलगा वायु आणि सोनमचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनम कपूर तिचा मुलगा वायुला मिठी मारताना दिसत आहे. आनंद आहुजाने शेअर केलेला हा फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोनम कपूरच्या या फोटोवर अनेकडण कमेंट्स करत आहेत.

बॉलिवूड कलाकारांनी दिली प्रतिक्रिया
- Advertisement -

आनंद आहुजाने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक बॉलिवूड कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. सोनमने देखील या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे तर सुनिता कपूर आणि महीप कपूरने देखील या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

‘द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर डंका; 200 कोटींचा टप्पा पार

- Advertisment -