घरमनोरंजनसोनम कपूरच्या मुलाचं पार पडलं बारसं; फोटो शेअर करत ठेवलं 'हे' अनोखं...

सोनम कपूरच्या मुलाचं पार पडलं बारसं; फोटो शेअर करत ठेवलं ‘हे’ अनोखं नाव

Subscribe

सोनमने तिच्या मुलाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. सोनम आणि तिचा पती आनंद आहूजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर करत आपल्या मुलाचं नाव सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर जेव्हापासून आई झाली तेव्हापासून तिचे चाहते तिच्या मुलाची झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच सोनमने तिच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. सोबतच सोनमने तिच्या मुलाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. सोनम आणि तिचा पती आनंद आहूजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर करत आपल्या मुलाचं नाव सांगितलं आहे.

नुकत्याच काही वेळापूर्वी सोनमने तिच्या सोशल इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सोनम, आनंद पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत, इतकंच नव्हे तर आनंदच्या हातात त्यांच बाळ देखील आहे. त्याला सुद्धा त्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

- Advertisement -

सोनमने कॅप्शनमध्ये तिच्या मुलाचं नाव ‘वायू’ ठेवल्याचं सांगितलं आहे. शिवाय तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आमच्या जीवनामध्ये नवीन श्वास जोडला गेला आहे. भगवान हनुमान आणि भीमाच्या रूपामध्ये आपल्या सामर्थ्याचे आणि धैर्याचे प्रतीक. सर्वांकडे आमचा मुलगा वायु कपूर आहुजासाठी आर्शिवाद मागू इच्छितो. हिंदू धर्मामध्ये वायू पाच तत्वातील एक प्रतीक आहे. वायु एक दैवत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मुलाचे नाव वायू ठेवलं आहे.” अशा प्रकारची मोठी पोस्ट शेअर करत सोनमने आपल्या मुलाचं नाव सांगितलं आहे.

या कॅप्शनखाली सोनमने आणखी मोठं कॅप्शन लिहिलंय की, “ते श्वासाचे दैवत आहेत. ते हनुमान, भीम आणि माधव यांचे आध्यात्मिक पिता आहेत. वायू हे जीवन आहे, जे विश्वातील जीवन आणि बुद्धिमत्तेची मार्गदर्शक शक्ती आहे.” दरम्यान, 20 ऑगस्ट 2022 रोजी सोनमने आपल्या मुलाला जन्म दिला होता.


सोनम कपूरने दिला गोंडस मुलाला जन्म; पोस्ट शेअर करत मानले देवाचे आभार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -