शंकर महादेवन यांनी गायलं “गेट टूगेदर” चित्रपटासाठी गाणं

अत्यंत फ्रेश लुक असलेल्या “गेट टूगेदर” या चित्रपटाविषयी जोरदार चर्चा आहे. विख्यात गायक शंकर महादेवन यांनी या चित्रपटासाठी “वाटा दूर जाती….” हे अतिशय श्रवणीय गीत गायले आहे. या गाण्याला सोशल मीडियातून उत्तम प्रतिसा लाभतो आहे. “गेट टूगेदर” हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत “गेट टुगेदर” या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, अतुल नवगिरे,साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

काही दिवसांपूर्वीच “गेट टुगेदर” या चित्रपटातलं जावेद अली आणि प्रियंका बर्वे यांनी गायलेलं गाणं रिलीज करण्यात आलं होतं. त्यानंतर आता शंकर महादेवन यांचं गाणं रिलीज करण्यात आलं. शंकर महादेवन यांचं २०२३ मधलं मराठी चित्रपटातलं हे पहिलंच गाणं आहे. अतिशय आशयघन शब्द, श्रवणीय संगीत आणि शंकर महादेवन यांचा स्वर्गीय आवाज यामुळे या गाण्याचं कौतुक होत आहे.


हेही वाचा :

ए आर रहमान याला पोलिसांचा दणका, शो रंगात असताना बंद पाडला