घरट्रेंडिंगVideo: 'असा कसा रोग करोना...' हे करोनावरचं गाणं तुम्ही ऐकलंत का?

Video: ‘असा कसा रोग करोना…’ हे करोनावरचं गाणं तुम्ही ऐकलंत का?

Subscribe

करोना व्हायरसमुळे भारतात भीतीचं वातावरण आहे. प्रत्येकजण आपल्यापरीने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आव्हान करत आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी देखील कविता करत करोनाला घाबरू नका असं आवाहन केलं आहे. पण एखादी मोठी घटना घडली की सगळ्यात आधी सोशल मीडियारवर मोठ्या प्रमाणावर मीम्स व्हायरल होतात. यावेळी केवळ मीम्स नाही तर करोनाची गाणी देखील सोशल मीडियावर हीट होत आहेत.

गायक आणि गीतकार हे रवी वाघमारे यांचं हे करोनाचं गाणं इतकं व्हायरल झालं आहे. सध्या लग्नाच्या वरातींमध्ये करोनाच्या गाण्यांवर लोकांनी ताल धरला आहे. या गाण्यातून करोना व्हायरसविषयी जागृती करण्यात आली आहे. भोजपुरी म्युझिक इंडस्ट्रीनं देखील करोना व्हायरसलाही सोडलं नाही. सध्या युट्यूबवर ‘लहंगा में घुसल बा कोरोना’ हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक भोजपूरी आर्टिस्टनं करोना व्हायरसचा वापर करून गाणी बनवली आहेत.

- Advertisement -

गुड्डू रंगीलानं होळीच्या रंगाला जोडून हे गाणं बनवलं आहे. माझं हे गाणं फक्त मनोरंजनासाठी आहे. हा आजार कोणाला व्हावा अशी इच्छा नाही. असं गुड्डू रंगीला म्हणाला. या आधी देखील त्याने एनआरसीवर ही गाणं केलं होतं. हे गाणं देखील तुफान व्हायरल झालं होतं. ‘लहंगा में करोना व्हायरस’ हे गाणं आणलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -