गेले काही दिवस बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भटट् आणि अभिनेत्री कंगना रणावत यांच्यातील वाद संपायचं चिन्ह दिसत नाहीये. गेले अनेक दिवस त्या दोघी सतत एकमेकांवर आरोप करताना दिसतायत. आता या आरोप प्रत्यारोपांच्या खेळात कंगनाच्या बहिणीनेही उडी घेतली आहे. ‘लम्हे’ चित्रपटाच्या प्रिव्ह्युदरम्यान महेश भट्ट यांनी कंगनाला चप्पल फेकून मारली होती. असा खळबळजनक खुलासा कंगनाची बहिण रंगोलीने केला आहे.
काही दिवसांपूर्वी कंगनाने अभिनेत्री आलिया भट्टवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आलियानेदेखील कंगनाला प्रत्युत्तर दिलं होतं. आता या दोघींच्या वादात आलियाची आई सोनी राजदान आणि कंगनाची बहीण रंगोलीने उडी घेतली आहे. त्यामुळे हा वाद आता काही संपणार नाही, तर तो वाढेलच अशी चिन्ह दिसत आहेत.
Dear Soni ji, Mahesh Bhatt never gave her a break, Anurag Basu did, Mahesh Bhatt ji works as a creative director in his brothers production house….(contd) @Soni_Razdan https://t.co/SD22ztrQ29
— Rangoli Chandel (@Rangoli_A) April 16, 2019
आलियाची आई सोनी राजदान हीने ट्वीटरवरून कंगनावर टीका केली होती. ‘महेश भट यांनी कंगनाला चित्रपटामध्ये ब्रेक दिला. पण हीच कंगना सतत महेश भट यांच्यावर, पत्नी व मुलीवर टीका करतेय. यावर मी काय बोलू ? हे असं सारं करण्यामागे तिचा हेतू तरी काय? ’,असं ट्वीट करत सोनी राजदान यांनी कंगनाला छेडलं होतं. मात्र या सोनी राजदानी यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाच्या बहिणीने एक खळबळजनक आरोप केला आहे.
(Contd)…. please note that he doesn’t own that production house, after Woh Lamhe when Kangana refused to do a film written by him called ‘Dhokha where he wanted her to play a suicide bomber he got so upset that he not only shouted at her in his office….. (contd) @Soni_Razdan
— Rangoli Chandel (@Rangoli_A) April 16, 2019
…. but later when she went for Woh Lamhe preview to a theatre he threw chappal on her, he didn’t allow her to see her own film, she cried whole night …. and she was just 19years old . @Soni_Razdan
— Rangoli Chandel (@Rangoli_A) April 16, 2019
काय म्हणाली रंगोली..
रंगोली म्हणते, महेश भट्ट यांनी कंगनाला चित्रपटामध्ये ब्रेक दिला हे खोटं आहे. कंगनाला खरा ब्रेक तर अनुराग बासूने दिला आहे. त्या चित्रपटामध्ये महेश भट्ट केवळ क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. त्यानंतर महेश भट्ट यांनी कंगनाला धोखा या चित्रपटासाठी विचारलं होता. मात्र कंगनाने या चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर ‘लम्हे’ चित्रपटाच्या प्रिव्ह्युदरम्यान त्यांनी कंगनाला चप्पल सुद्धा फेकून मारली होती. यावेळी कंगना केवळ १९ वर्षांची होती. त्या रात्री कंगना रात्रभर रडली होती. असं चोख उत्तर रंगीलाने आलियाच्या आईला दिलं.
रंगोलीच्या या खुलाशानंतर हा वाद आता कोणतं वळण घेणार हे येणारा काळच ठरवेल.