बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने आजवर त्याच्या कारकिर्दीत संगीत विश्वाला अनेक सुमधुर गाणी दिली आहेत. त्यामुळे सोनू निगमचा चाहता वर्ग दिवसागणिक वाढतोय. दरम्यान, कधी प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी पर्सनल लाईफमुळे सोनू निगम कायम चर्चेत राहतो. सध्या सोनू निगमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात गायक वेदनेने कळवळताना दिसतोय. हा व्हिडीओ त्याच्या पुण्यात आयोजित केलेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमधला आहे. पाहुयात हा व्हिडीओ आणि जाणून घेऊया नेमकं घडलं काय? (Sonu Nigam suffered back pain during the live show)
लाइव्ह कॉन्सर्टमध्ये बिघडली तब्येत
प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. ज्यामुळे तो कायम वेगवेगळ्या शहरात लाइव्ह शो करताना दिसतो. असाच एक लाइव्ह शो नुकताच पुण्यात पार पडला. यावेळी परफॉर्म करताना अचानक सोनूची तब्येत बिघडली आणि तो वेदनेने अक्षरशः कळवळताना दिसला. मात्र, इतक्या वेदना असतानाही त्याने हा शो थांबवला नाही. तर आपल्या चाहत्यांसाठी पूर्ण केला. यानंतर सोशल मीडियावर त्याने आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. यावेळी सोनू निगमने हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि असह्य होता, असे म्हटले आहे.
माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण दिवस
सोनू निगमने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सोनू बेडवर झोपलेला दिसतोय. या व्हिडिओत सोनूच्या चेहऱ्यावर त्याला होणाऱ्या वेदना अगदी स्पष्ट दिसत आहेत.
View this post on Instagram
यावेळी लाइव्ह शोदरम्यान काय घडलं याबाबत सांगताना तो म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण दिवस होता. पण तितकाच समाधानकारकसुद्धा! मी गात होतो आणि हलत डुलत होतो. ज्यामुळे पेटके येण्यास सुरुवात झाली. पण मी कसंबसं स्वतःला सावरलं. मला चाहत्यांच्या अपेक्षेसमोर कमी पडायचे नव्हते आणि मला आनंद आहे की सर्व काही ठीक आहे’.
मणक्यात सुई मारल्यासारख्या वेदना
आपल्या तब्येतीविषयी बोलताना सोनू म्हणाला, ‘खूप वेदना होत होत्या. असं वाटत होतं जसं कुणी माझ्या मणक्यात सुई मारली आहे. त्यामुळे मी थोडा जरी हललो तरी असह्य वेदना व्हायच्या’. हा व्हिडीओ शेअर करताना सोनू निगमने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काल रात्री माता सरस्वतीने माझा हात पकडला होता’. या कॅप्शनसोबत त्याने हात जोडलेला इमोजीदेखील शेअर केला आहे. सध्या सोनू निगमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.
लवकर बरा हो..
सोशल मीडियावर सोनू निगमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या प्रकृती संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तर काही चाहत्यांनी ‘लवकर बरा हो..’ म्हणत सोनूच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. सोनू निगम एक अप्रतिम भारतीय गायक आहे. ज्याने आजवर विविध भाषेतील गाणी गायली आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड़, तेलुगु, तामिळ, उड़िया, इंग्रजी, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, नेपाली, तुलु, मैथिली आणि मणिपुरी अशा विविध भाषांचा समावेश आहे.
हेही पहा –
Suraj Chavan : सुरज चव्हाणच्या झापूक झुपूकची रिलीज डेट जाहीर