घरताज्या घडामोडीसोनू सूदने चाहत्यासाठी घेतली म्हैस!

सोनू सूदने चाहत्यासाठी घेतली म्हैस!

Subscribe

लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी देव झालेला अभिनेता सोनू सूद. सोनू सूदचा अद्यापही या लोकांच्या मदतीसाठी झटत आहे. हजारो लोकांनी सोनूने त्यांच्या घरी त्यांना सुखरूप पोहचवलं आहे आणि त्याच मदतकार्य अद्याप सुरू आहे. आता सोनू केवळ देशातील नाही तर विदेशातील लोकांना मदत करत आहे. अलीकडेच त्याने बिहारमधील एका व्यक्तीसाठी म्हशीची खरेदी केली आहे.

- Advertisement -

एका ट्विटर युजरने ट्विट केले की, चंपारणमध्ये आलेल्या पूरामध्ये भोलाने आपाला मूलगा आणि म्हैस दोन्ही गमावली. जो त्याचे उत्पान्नाचे एकमेव साधन होते. त्याचे झालेले नुकसान नीती गोयल आणि सोनू सूदच करूच शकतात. त्याला एक म्हैस घेऊन द्या, जेणेकरून तो आपल्या जगण्यासाठी काही पैसे कमवू शकेल आणि आपल्या मुलांचे पालनपोषण करील.

- Advertisement -

या ट्विटला प्रतिक्रीया देताना सोनू म्हणाला, “माझी पहिली कार खरेदी करतानाही इतका उत्साही नव्हतो, जेवाढा उत्साही मी नवीन म्हैस खरेदी करताना आहे. जेव्हा मी बिहारमध्ये येतो, तेव्हा मी एक ग्लास ताजे म्हशीचे दूध पितो.” सोशल मीडियावर सोनू सूदच्या या प्रतिक्रीयेवर अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

सोनू सूद यांनी लॉकडाऊनमधील मजुरांच्या स्थितीवर एक पुस्तक लिहिले आहे, जे लवकरच प्रकाशित होणार आहे.

सोनूकडे इतर मागण्या

लॉकडाउनचा कालावधी सुरु झाल्यानंतर सोनूने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत नागरिकांना त्यांच्या समस्या सांगण्याचं आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे त्याच्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला असून त्यांच्या समस्या ते सांगत आहे. सोनूकडे सध्या ई-मेल,फेसबुक, ट्विटर, लेटर किंवा इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमातून लोक मदतीची मागणी करत आहेत. त्यामुळे सोनूकडे जवळपास दिवसाला हजारोंच्या संख्येने मगदतीची मागणी होत आहे.


हे ही वाचा – बिग बॉस १३ चा स्पर्धक हिंदुस्थानी भाऊचे Instagram Account बंद, कारण…


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -