४ हात, ४ पाय असलेल्या मुलीला सोनू सूदने दिलं नव आयुष्य

सोनू सूदने केवळ त्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी मदतच केली नाही तर तो कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला

sonu sood gave new life to daughter of bihar with 4 legs and 4 hands said our journey was successful

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना काळापासून अनेकांसाठी देवदूत बनला. जेव्हा जेव्हा कोणाला काही अडचण येते तेव्हा सोनू सूद देवदूतासारखा मदतीस उभा राहिला. सोनू सूदने लॉकडाऊनदरम्यान शेकडो परप्रांतीयांना मदत केली. मोठ्या पडद्यावर सोनू सूद खलनायकाच्या भूमिकेत झळकला तरी तो सध्याच्या काळात तो सुपरस्टार झाला आहे. त्याचवेळी आता बिहारमधील एका निष्पाप मुलीच्या मदतीसाठी सोनू सूद धावून आला आहे. अभिनेत्याच्या मदतीनंतर या मुलीला नव जीवन मिळाले आहे.

अलीकडेच सोनू सूदने सोशल मीडियावर बिहारच्या मुलीची माहिती मिळाली होती. बिहारच्या नवादा जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील चौमुखी नावाची ही मुलगी जिला चार हात आणि चार पाय आहेत. या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करावी अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी केली होती. अशा परिस्थितीत सोनू सूदने केवळ त्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी मदतच केली नाही तर तो कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला.

चौमुखी असे या मुलीचे नाव असून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर सांगितले की, मुलीवर उपचार सुरू झाले आहेत. सोनू सूदच्या मदतीने चौमुखीचे अतिरिक्त हात आणि पाय काढण्यात आले आहेत. किरण हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तब्बल 7 तासांच्या ऑपरेशननंतर चौमुखीचे अतिरिक्त हात आणि पाय काढून तिला नवजीवन दिले. किरण हॉस्पिटलनेही याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे.

चौमुखी ही वारिसलीगंज ब्लॉकमधील हेमडा गावची रहिवासी आहे. जन्मापासून चौमुखीला पोटातून दोन हात आणि दोन पाय होते. मात्र या अतिरिक्त हात आणि पायांमुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तिच्या अडचणी पाहता तिच्या कुटुंबियांनी हे अतिरिक्त हात आणि पायांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सोशल मीडियावर मदतीची विनंती केली होती. या मदतीसाठी सोनू सूद पुढे आल्याने त्याचे कौतुक केले जात आहेत. सोनू सूदबद्दल असे म्हटले जाते की, तो नेहमी लोकांच्या बाजूने उभा असतो.


बांग्लादेशात नुपूर शर्माविरोधात जोरदार निदर्शने, भारतावर बहिष्कार टाकण्याची मागणी