Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सलाम! सोनू सूदने आईच्या नावे बनवला पक्का रस्ता

सलाम! सोनू सूदने आईच्या नावे बनवला पक्का रस्ता

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या सामाजिक कार्यासाठी ओळखला जातोय. कोरोना काळात त्याने गोरगरीबांपासून ते विद्यार्थांपर्यंत साऱ्यांना जमेल तशी मदत केली. या वृत्तीचे श्रेय तो नेहमी आईला देतो. अनेक मुलाखतीमध्ये सोनू सूद आईच्या आठवणींना उजाळा देत असतो. आईच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सोनूने एक कौतुकास्पद काम केले आहे. ते म्हणजे आईच्या नावाने त्यांने गावात चक्क पक्का रस्ता बनवला आहे. याची माहिती सोनुने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून शेअर केली आहे. याविषयी सोनुने लिहिले की, हे माझ्या आयुष्यातील सर्वात खास ठिकाणांपैकी एक आहे. या रस्त्याचे नाव ‘प्रोफेसर सरोज सूद’ असे आहे. मी आयुष्यभर या रस्त्यावर चाललो आहे. माझे घर त्या बाजूला आहे आणि मी याच रस्त्याने नेहमी शाळेत जात होतो. मीच नाहीतर माझे वडील आणि आईसुद्धा या रस्त्याने जात होते. माझ्या आयुष्यातील हा एक खास क्षण आहे. रात्रीचे अडीच वाजले आहेत आणि मी माझ्या घरी जात आहे. सोनुने आपल्या गावातील खराब रस्ता पक्का करत आईच्या आणि एकंदरीत त्याचा लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या रस्त्यावरील अनेक आठवणी सोनु सूदने जपून ठेवल्या आहेत.

- Advertisement -

अनेकदा सोनू लोकपयोगी कामांसाठी पुढे येत आहे. याच अनेक उदाहरणे आपण गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियातून पाहिली. काही दिवसांपूर्वी बासू गुप्ता नावाच्या तरुणाने सोनुला ट्विटरच्या माध्यामातून मदतीची मागणी केली होती. गावात माकडांच्या हल्ल्यामुळे अनेक नागरिक जखमी होत आहेत. माकडांच्या या दहशतीवर तुम्ही काहीही करुन आमच्या गावापासून या माकडांना दूर करत जंगलात पाठवा असे त्या तरुणाची मागणी होती. यावर सोनूने अगदी गमतीदार उत्तर दिले होते. सोनू म्हणाला, आता हे माकड पकडायचे काम राहिले होते, आता ते पण करून पाहतो मित्रा… पत्ता पाठवा…सोनू सूदच्या या अफलातून उत्तरानंतर एकच चर्चा रंगली होती की सोनु खरचं माकड पकडायला जातो की काय. सोनूने त्या गावातील ते माकड पकडून दाखवल्याचे एक ट्विट करून सोनू सूदने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, बघा आता माकडही पकडलं आहे, बोला… असे म्हणत सोनू त्या तरुणाच्या मदतीलाही धावून आला.


हेही वाचा- ‘प्यार हमे किसी मोड पे ले आया’ म्हणत विवेक ओबेरॉयने व्यक्त केली दिलगिरी

 

- Advertisement -