Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर हवय, सोनू सूदला आल्या २८ हजार रिक्वेस्ट

ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर हवय, सोनू सूदला आल्या २८ हजार रिक्वेस्ट

या कठीण काळात धाडसी पाऊलं उचलून देशाच्या कानाकोपर्‍यात अडकलेल्या किंवा गरजू व्यक्तींना मदतीचा हातभार लावला आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसचं संकट एकीकडे राज्यात आणि देशात कामय असताना दुसरी चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे अभिनेता सोनू सूद अडकलेल्या मजूरांना करत असलेली मदत. हजारो मजूरांना त्यांच्या गावी पाठवण्याचं काम तसेच लोकांना आवश्यक सोयी सुविधा,रुग्णालय,ऑक्सीजनबेड्स उपलब्ध करून देण्याचे काम सोनू सूद कोरोनाचं संकट ओढवल्यापासून करत आहे. त्याचा सर्व खर्च सोनू सूद स्वत: करत आहे. सोशल मीडियापासून समाजातल्या सर्वच स्तरांमधून सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनू सूदने नुकतच ट्विट करत त्याला मदतीसाठी आलेल्या लोकांचा आकडा आणि कोणत्या राज्यात किती मदतीची मागणी आली आहे याची माहिती ट्विट करत दिली आहे. सोनू सूद ने म्हंटले आहे की,” आज मला 27538 लोकांचे ऑक्सीजन,बेड्स आणि मेडीसीनच्या मदतीसाठी मेसेज आले आहेत. त्या मेसेज पैकी 70% मेसेज हे दिल्ली मधून, 20% मेसेज यूपी आणि 10% संपूर्ण इंडिया मधून करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हे सगळ लवकर थांबलं पाहिजे”असं ट्विट करत सोनू सूदने चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस देशामध्ये दाखल होऊन जवळ जवळ वर्ष पालटले आहे. अपुर्‍या सोयी सुविधे अभावी लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच कोरोंनाचं संकट देशावर ओढवल्या पासून सोनू सूद लोकांच्या मदतीसाठी मसीहा बनून धावून आला आहे. सोनू सूदने या कठीण काळात धाडसी पाऊलं उचलून देशाच्या कानाकोपर्‍यात अडकलेल्या किंवा गरजू व्यक्तींना मदतीचा हातभार लावला आहे.


हे हि वाचा – एका दिवसात ३ जवळच्या व्यक्तींचा मृत्यू, ‘ही’ अभिनेत्री करतेय सर्वांना मदत करण्याचे आवाहन

- Advertisement -