तीन वर्षानंतर Sonu Sood बॉलिवूडमध्ये ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक

sonu sood return bollywood after three years says south film saved me from during bad hindi film
Sonu Sood चे तीन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये या चित्रपटातून करणार कमबॅक

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) तब्बल साडेतीन वर्षांनंतर बॉलिवूड (Bollywood Industry) इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. तो शेवटचा रणवीर सिंगसह ‘सिम्बा’ या बॉलिवूड चित्रपट दिसला होता, रोहित शेट्टीच्या दिग्दर्शित सिम्बा चित्रपटानंतर सोनू सूदने कन्नडमध्ये ‘कुरुक्षेत्र’ हा चित्रपटात झळकला, तर तेलगूमध्ये ‘सीता’, Alludu Adhurs आणि आचार्य या चित्रपटातही त्याने अभिनय केला. या चित्रपटांनंतर तब्बल साडे तीन वर्षांनी तो ‘सम्राट पृथ्वीराज’ ( Samrat Prithviraj) या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सोनू सूद चांर बरदाईची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून चाहत्यांमध्ये हा चित्रपट चर्चेत आहे. सोनू सूदचे चाहतेही त्याला बॉलिवूड सिनेमात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट हिंदीत बनवण्यात आला आहे, मात्र तमिळ आणि तेलुगु दोन भाषांमध्ये हा चित्रपट डब करण्यात येणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचे नाव ‘पृथ्वीराज’ असे ठरवलेले होते. मात्र वादामुळे या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले. आता या चित्रपटाचे नाव आहे ‘सम्राट पृथ्वीराज’ असे जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि मानुषी छिल्लर देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’ व्यतिरिक्त सोनू सूद Thamilarasan तमिळ आणि ‘फतेह’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ‘फतेह’ हा चित्रपट सोनू सूदच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनवला जाणार आहे. त्याचे को- प्रोड्यूस झी स्टुडिओज करणार आहे. सोनू सूदने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली होती. सोनू सूदच्या या हिंदी चित्रपटाची चाहत्यांनाही उत्सुकता आहे.

साऊथविरुद्ध बॉलिवूड वादावर सोनू सूद म्हणाला की…

एका मुलाखतीत बोलताना सोनू सूदने साऊथविरुद्ध बॉलिवूड (Sood hindi vs south debate) असा सुरु असलेल्या वादावर आपले मत मांडले आहे. सोनू सूदने यावेळी बॅक टू बॅक साऊथचे चित्रपट केले पण हिंदी चित्रपट का केले नाही याचे कारणही सांगितले आहे, “माझ्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट्सबद्दल मी नेहमीच खूप निवडक असतो. तमिळ चित्रपट असो किंवा तेलुगू किंवा हिंदी चित्रपट. साऊथ चित्रपटांनी मला वाईट हिंदी चित्रपट करण्यापासून वाचवले आहे, कारण आपल्या आयुष्यात एक टप्पा येतो. जेव्हा आपण फक्त मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी चित्रपट करायला सुरुवात करतोस तेव्हा साऊथच्या चित्रपटांनी मला या विचारापासून वाचवले आहे.


कार्तिकच्या ‘Bhool Bhulaiyaa 2’ ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; कमाईचा आकडा तर पाहा