देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका कलाकारांना बसला आहे. अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी देव झालेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याने याबाबत ट्वीटद्वारे पोस्ट करून माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतः क्वारंटाईन झालो आहे. चिंता करण्याची गरज नाही आहे. उलट तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आता माझ्याकडे जास्त वेळ असेल. कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्या सोबत आहे, लक्षात ठेवा.’ सोनू सूदच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी त्याला लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
— sonu sood (@SonuSood) April 17, 2021
काही दिवसांपूर्वी सोनू सूदने कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला होती. त्यानंतर त्यांने लसीकरण मोहिमेला सुरुवात केली होती. या मोहिमेला सोनूने ‘संजीवनी’ असे नाव दिले आहे. यासंदर्भात देखील सोनू सूदने ट्वीर करून सांगितले होते की, मी कोरोनाची लस घेतली आहे. आता देशातील इतरांनी देखील लसीकरण करावे. आम्ही संजवनी नावाची लसीकरणाची सर्वात मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमुळे लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण होईल. त्यामुळे ही मोहीम लस घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करेल.