घरमनोरंजनसोनू सूद अडकला लालबागच्या गर्दीत; व्हिडीओ व्हायरल

सोनू सूद अडकला लालबागच्या गर्दीत; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाच्या दर्शनाला लाखो भाविक गर्दी करत आहेत. लालबाग राजाच्या दर्शनाला अनेक बॉलिवूड कलाकार देखील भेट देत आहेत. नुकत्याच काही तासांपूर्वी अभिनेता सोनू सूद आणि फराह खान देखील राजाच्या दर्शनाला पोहोचले होते. मात्र, त्यावेळी हे दोन्ही कलाकार देखील सामान्य लोकांप्रमाणेच गर्दीमध्ये अडकलेले दिसले.

सोनू सूद अडकला लालबागच्या गर्दीत

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सोनू सूद आणि फराह खानसह अनेक कलाकार लालबागच्या राजाला भेटीला आलेले दिसत आहेत. यादरम्यान सोनू आणि फराह गर्दीत अडकतात. या क्लिपवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.

- Advertisement -

या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलंय की, ‘देवाच्या दरबारात सगळे समान आहेत.’ दुसर्‍याने लिहिलंय, “आता मला समजले की सामान्य माणसाला किती त्रास होतो.” आणखी एका यूजरने लिहिलंय की, ‘प्रत्येकाला गणपती बाप्पासमोर नतमस्तक व्हावे लागेल.”


हेही वाचा : Photo : म्हातारी दिसतेस… कंगनाच्या लूकवर चाहत्याची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -