घरमनोरंजनसोनू सूदने शिक्षण क्षेत्रात टाकले पाऊल, सीए शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थांना देणार मोफत...

सोनू सूदने शिक्षण क्षेत्रात टाकले पाऊल, सीए शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थांना देणार मोफत शिक्षण

Subscribe

अभिनेता सोनू सूदने लोकांची मदत करण्यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.

कोरोना व्हायरसचे संकट अद्याप कायम आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अभिनेता सोनू सूद लोकांच्या मदतीकरिता पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे. सोनूने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याच्यावर सर्व स्तरावरुन कौतूकाचा वर्षाव होत आहे. देशभरातील राज्यात ऑक्सीजन प्लांट लावण्यापासून ते मेडिकल सुविधा उपलब्ध करुन देण्यापर्यंत सोनूने अनेक लोकांचे जीव वाचवले आहे. आता सोनूने एक पाऊल शिक्षणाकडे वळवले आहे. सोनूने सीएचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांसाठी मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. अनेक आईएएस विद्यार्थांची मदत केल्यानंतर अभिनेता सोनू सूदने लोकांची मदत करण्यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

सोनूने ‘सोनू सूद चॅरिटी फांऊडेशन’ अंतर्गत सीएचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांसाठी इंटर्नशिप करण्याची संधी तसेच कोचिंग,प्लेसमेंट मिळवून देण्यास मदत करणार असल्याचे कळतेय. यासाठी विद्यार्थांना सोनू सूदच्या चॅरिटी फांऊडेशन वेबसाइटवर जाऊन पुढिल माहिती मिळवावी लागणार आहे तसेच रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासंबधीत सोनू सूदने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवर माहिती देत ट्विट करत लिहलं आहे की, “भारताच्या अर्थव्यवस्थेला वाढवण्यासाठी,आपल्याल सीए शिकणाऱ्यांची गरज आहे. आणि आम्ही त्या दिशेने एक लहान पाऊल उचलले आहे.” .या पुर्वी सुद्धा सोनू सूदने भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यांर्थांकरीता विनामुल्य कोचिंग देण्याची घोषणा केली होती. सोनूने यूपीएससी सारख्या परीक्षा देणाऱ्या तसेच आईएएस इच्छुक विद्यार्थांसाठी विनामुल्य कोचिंग देण्यासाठी ‘संभवम’ ची घोषणा केली होती.



हे हि वाचा – ‘जय मल्हार’ मधील ‘म्हाळसा’ सुरभी हांडे दिसणार देवी सप्तशृंगीच्या भूमिकेत

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -