अभिनेता सोनू सुदचा गरजुंसाठी मदतीचा हात

गरीबांच्या मदतीकरता अभिनेता सोनू सुद मदतीसाठी पुढे सरसावला आहे. सोनूने गरजुंसाठी बसेसची सोय केली आहे.

sonu sood
अभिनेता सोनू सूद

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वच जण लढत आहेत. मात्र, तरीही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश काही आलेले नाही. त्यामुळे राज्या राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांसह गरजूंचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, मजुरांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी विशेष ट्रेन देखील सोडण्यात आली आहे. मात्र, मजुरांचे होत असलेले स्थलांतर राज्यांसमोर एक मोठे संकट उभे राहू लागले असताना आता त्यांच्या आणि गरीबांच्या मदतीकरता अभिनेता सोनू सुद मदतीसाठी पुढे सरसावला आहे. सोनूने गरजुंसाठी बसेसची सोय केली आहे.

अभिनेता सोनू सुद गेल्या कित्येक दिवसांपासून विविध मार्गाने गरजुंची मदत करत आहे. अनेकांना जेवण पुरविण्यासोबतच त्यांनी आता गावी पायी चालत जाणाऱ्यांसाठी बसची सोय केली आहे. सोनूने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून रितसर परवानगी घेऊन मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे खुद्द सोनू प्रत्येक मजुराला निरोप देण्यासाठी जात आहे.

काय म्हणाला सोनू सुद?

‘सध्या पायी जाणारे प्रवासी आपल्या देशाचा भाग आहे. तसेच हे प्रवासी सध्या उन्हातान्हात आपल्या कुटुंबासोबत रस्त्याने पायपीट करत आहेत, हे साऱ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरुन ही परिस्थिती पाहिली पाहिजे. तेव्हा आपल्याला या परिस्थितीची जाणीव, त्यांचे दु:ख कळेल. त्यानुसार मी माझं कर्तव्य करत आहे. प्रवाशांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी मी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारकडून १० बसची परवानगी मिळविली आहे’, अशी माहिती ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनूने दिली आहे.

दरम्यान, देशात लॉकडाउनची घोषणा झाल्यापासून सोनू सतत विविध मार्गाने गरजुंची मदत करत आहे. त्याने आतापर्यंत अनेक गरजुंच्या जेवणाची सोय केली आहे. तसेच त्याचे काही हॉटेल्सदेखील डॉक्टर, नर्स यांच्यासाठी खुले केले आहेत.


हेही वाचा – करीनाच्या सौंदर्याचे आहे ‘हे’ रहस्य