Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन सोनू सुदला भेटण्यासाठी चक्क हैदराबादहून अनवाणी पायी चालत गाठली मुंबई!

सोनू सुदला भेटण्यासाठी चक्क हैदराबादहून अनवाणी पायी चालत गाठली मुंबई!

फोटोमध्ये दिसणारा मुलगा चक्क सोनूला भेटण्यासाठी हैद्राबादहून चालत मुंबईमध्ये आला.

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसच्या संकटात लोकांचा मसीहा बनून त्यांची मदत करणारा अभिनेता सोनू सुद चांगलाच चर्चेत आला होता. कोरोना व्हायरसचा कहर देशात बरसल्या पासून सोनू अनेक लोकांची मदत करत आहे. सोनूच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. नुकतच सोनू सुदने सोशल मीडियावर आपल्या एका चहत्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दिसणारा मुलगा चक्क सोनूला भेटण्यासाठी हैद्राबादहून चालत मुंबईमध्ये आला. सोनू सुदने संगितले की या फॅनसाथी खास ट्रंसपोर्टेशनची व्यवस्था केली होती पण त्याने चालत येण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद ते मुंबई मधील अंतर जवळ-जवळ 709 किमी आहे. एवढे अंतर पार करून फक्त सोनूची भेट व्हावी यासाठी त्याने चालत मुंबईला येण्याचा निर्णय केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

- Advertisement -

सोनूने सोशल मीडियावर या चहत्या सोबत एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं आहे की,”व्यंकटेश. मी त्याच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करूनही हा मुलगा मला भेटण्यासाठी हैदराबादहून मुंबईकडे अनवाणी पायांनी चालत आला. तो खरोखर प्रेरणादायक आहे आणि मी त्याचा खूप आभारी आहे. तसेच हे सर्व करण्यासाठी आणि कोणालाही अशा प्रकारचा त्रास करून घेण्यास मी प्रोत्साहित करणार नाही. तुम्हा सर्वांना प्रेम.”


हे हि वाचा – थुकरट वाडीचे विनोदवीर आता मुंबईमध्ये शूटिंगसाठी सज्ज

- Advertisement -