घरमनोरंजनही वेळ आपल्या बहिणींना साथ...चंदीगड युनिव्हर्सिटी व्हिडीओ प्रकरणाबाबत सोनू सूदची पोस्ट चर्चेत

ही वेळ आपल्या बहिणींना साथ…चंदीगड युनिव्हर्सिटी व्हिडीओ प्रकरणाबाबत सोनू सूदची पोस्ट चर्चेत

Subscribe

या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात अभिनेता सोनू सूद याने देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून या प्रकरणात संयमाने पाऊल उचलण्याचा सल्ला दिला आहे.

चंदीगड युनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थिनीने मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याचा खुलासा झाल्यानंतर रविवारी दिवसभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी संबंधिक आरोपी विद्यार्थीनी आणि तिच्या प्रियकराला शिमलातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात अभिनेता सोनू सूद याने देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून या प्रकरणात संयमाने पाऊल उचलण्याचा सल्ला दिला आहे.

सोनू सूदने त्याच्या ट्वीट अकाऊंटवर लिहिलंय की, “चंदीगढ युनिव्हर्सिटीमध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. ही वेळ आपल्या बहिणींना साथ देण्याची आहे आणि एक जबाबदार नागरिक होऊन परिचय देण्याचा आहे. ही वेळ आपल्या परिक्षेची आहे. पीडित पक्षाच्या परिक्षेचा नाही. जबाबदारी पूर्वक काम करा. सध्या सोनू सूदचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.”

- Advertisement -

काही विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न?
या घटनेमुळे वसतिगृहातील काही विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. मात्र युनिव्हर्सिटी प्रशासन आणि पलिसांकडून ही माहिती खोटी असल्याचे सांगण्यात आले, त्याचवेळी एका बेशुद्ध अवस्थेतील मुलीला अॅम्ब्युलन्समधून नेतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. दुसरीकडे विद्यापीठ व्यवस्थापन कॅम्पसमधील विद्यार्थ्यांवर या प्रकरणी कोणतेही वक्तव्य न करण्यास दबाव टाकत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युनिव्हर्सिटी प्रशासनाने वसतिगृहाच्या दोन वॉर्डनना निलंबित केले आहे. तर युर्निव्हर्सिटी सहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मुलींच्या कपड्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ले कार्बोइसर हॉस्टेलच्या वॉर्डन राजविंदर कौरला युनिव्हर्सिटी प्रशासनाने निलंबित केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

चंदीगड युनिव्हर्सिटी व्हिडीओ कांडप्रकरणी विद्यार्थी पुन्हा आक्रमक; युनिव्हर्सिटी 6 दिवस बंद

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -