रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर सोनू सूदची प्रतिक्रिया म्हणाला, तुम्ही अशाप्रकारचं शूट करता तेव्हा तुम्ही आपोआप…

काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर अभिनेत्री आलिया भट्ट, विद्या बालन यांनी रणवीरची पाठराखण केलेली होती. आता या यादीत अभिनेता सोनू सूदचं नाव देखील जोडलं जात आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. एका मॅगजीनसाठी त्याने हे फोटोशूट केलं होतं. यावेळी त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, शिवाय काही जणांनी तर त्याच्या अतरंगी फोटोंवर मिम्स सुद्धा तयार केले. तर काही ठिकाणी रणवीरवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान आता, रणवीर सिंहच्या समर्थन करण्यासाठी अनेक कलाकार त्याची पाठराखण करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर अभिनेत्री आलिया भट्ट, विद्या बालन यांनी रणवीरची पाठराखण केलेली होती. आता या यादीत अभिनेता सोनू सूदचं नाव देखील जोडलं जात आहे.

एका मुलाखतीत सोनू सूदने रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटबाबत आपलं मत मांडलं आहे. त्यावेळी तो म्हणाला की, “हा मला वाटतं की, ज्याप्रकारे व्यक्ति फोटो काढतो. ती त्याची आवड आहे. आपण अशा जगात राहतो. जिथे तुम्ही काही वेगळं करता, तेव्हा अनेक लोक तुमच्याविरोधात बोलू लागतात. परंतु मला वाटतं की, जेव्हा तुम्ही अशाप्रकारचं शूट किंवा वेगळं काही करता तेव्हा तुम्ही आपोआप समोरून येणाऱ्या प्रतिक्रियांसाठी तयार झालेले असता. त्यामुळे जर तुम्ही या सर्व गोष्टींसाठी तयार असाल तर असं काही करण्यास हरकत नाही.”

पेटा इंडियाकडूनही रणवीर सिंहला न्यूड फोटोशूटसाठी ऑफर
मागील काही दिवसांपूर्वी पेटा इंडियाने रणवीर सिंहला एक पत्र लिहून त्यांच्यासाठी न्यूड फोटोशूट करण्याची ऑफर दिली होती. या पत्रामध्ये लिहिलं होतं की, आम्ही पेपर मॅगझीनसाठी केलेलं तुमचे फोटोशूट पाहिलं. आम्हाला आशा आहे की, तू आमच्यासाठीही कपड्याचे बलिदान देशील. प्राण्यांवर तुझे किती प्रेम आहे हे आम्हाला माहित आहे. पेटा इंडियाच्या एका जाहिरातीसाठी तु न्यूड फोटोशूट करू शकतोस का?

चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने केली होती तक्रार
रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्या स्वयंसेवी संस्थेच्या मते, “भारत संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला नायक म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांना फॉलो करतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये. असं तक्रारीत चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. या संस्थेने रणवीर सिंहवर कलम २९२,२९३, ३५४ आणि ५०९, ६७अ हे कलम लावण्यात आले आहेत.


हेही वाचा :आमच्यासाठीही न्यूड फोटोशूट कर; पेटाचे रणवीर सिंहला लेटर