Video – घराचा झाला सेट, कुटुंब बनलं क्रू मेंबर आणि तयार झाली मालिका!

या मालिकेचं लिखाण आणि दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांनी केलं आहे. त्यांच्या या नव्या मालिकेत एकूण १६ कलाकार आहेत.

आठशे खिडक्या नऊशे दारं

सध्या क्वारेनटाईनमुळे प्रत्येक जण आपापला वेळ प्रॉडकटिव्ह पद्धतीनं घालवण्याचा विचार करतोय. नवनवीन गोष्टी करण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या जात आहेत, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अशीच एक मजेशीर युक्ती सोनी मराठी वाहिनीने लढवली आहे. ‘सोसायटीत आता चौकशा होणार, सोसायटीत जे काही घडतंय ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढणार, चर्चा म्हणजेच गॉसिप्स होणार आणि नवीन रहिवाशांची ओळख होणार कारण ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या मालिकेचं लिखाण आणि दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांनी केलं आहे. त्यांच्या या नव्या मालिकेत एकूण १६ कलाकार आहेत. कलाकारांशिवाय मालिका होणं नाही, पण सध्या शुटिंग बंद असल्यामुळे शुटिंग कसं होणार असाही प्रश्न पडला … या नव्या मालिकेत असलेले सर्व कलाकार हे आपापल्या घरातून शूट करणार आहेत.

‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेचं हे नाव जितकं भन्नाट आहे तितकीच भन्नाट आणि मजेशीर नावं या मालिकेतल्या पात्रांची आहेत. समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांच्यासह एकूण १६ अतरंगी कलाकार ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या कार्यक्रमामध्ये दिसणार आहेत. १८ मेपासून सोमवार आणि मंगळवारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिकेचं  जेव्हा ऑन सेट शुटिंग होतं, तेव्हाच कित्येकदा तांत्रिक अडचणी येत असतात मग आता जेव्हा स्वतःच्या घरून शूट करण्याची वेळ येणार, तेव्हा  कलाकारांसाठी हे खूप आव्हानात्मक ठरणार आहे. तंत्रज्ञांच्या मदतीशिवाय मालिका शूट करणं  तितकं सोपं नाही, पण केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कलाकार हे आव्हान आनंदानं आणि मेहनतीनं पूर्ण करणार आहेत आणि  लवकरच  एक नवी, मनोरंजक, हलकीफुलकी आणि खुसखुशीत मालिका ते सर्वांसमोर घेऊन येण्यासाठी सज्ज होताहेत.

सर्व कामांचं योग्य नियोजन करून, कलाकारांनी घरून शूट करणं आणि लॉकडाऊनमध्ये एक संपूर्ण नवी कोरी मालिका लाँच करणं हा टेलिव्हिजन क्षेत्रात होणारा पहिलाच आणि अनोखा उपक्रम असेल. हा उपक्रम राबविणं खरं तर खूपच आव्हानात्मक आहे, पण हे आव्हान सोनी मराठी वाहिनीनं अगदी लीलया पेललं आहे.


हे ही वाचा – ४६ वर्षीय मलायकाला व्हायचय पुन्हा आई, लॉकडाऊनमध्ये करतेय प्लॅनिंग!