घरमनोरंजनअश्लील गाण्यावर ॲक्टींग केल्याबद्दल माफी..रवि किशन

अश्लील गाण्यावर ॲक्टींग केल्याबद्दल माफी..रवि किशन

Subscribe

ला ज्या इंडस्ट्रिने प्रेम दिलं आहे त्याला स्वच्छ करण्याच मी प्रर्यत्न करेन.

भोजपुरी सुपरस्टार आणि खासदार रवि किशन यांनी काही दिवसांपुर्वी  अश्लील गाण्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या सगळीकडे खळबळ ऊडाली आहे. यामुळे रवि किशन यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. कारण चित्रपटसृष्टीमध्ये करियरच्या सुरुवातीला रवि किशनसुद्धा अशाच प्रकारच्या अश्र्लील गाण्यावर थिरकले होते. आता अनेक वर्षांनंतर रवि किशन यांनी केलेल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली आहे. तसेच त्यानी भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये अश्र्लील गाणं तयार होणे थांबल पाहीजे तसेच चांगला कंटेट बनवण्यावर फोकस करायला हवा असे वक्तव्य केलं आहे. इतकच नाही तर रवि किशन यांनी भोजपुरी सिनेमासाठी एकक स्वत्रंत सेंसर बोर्ड तयार करण्याची मागणि केली आहे. एका मुलाखती दरम्यान रवि किशन यानी स्वत: चे मत प्रकट केले आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, मी गायक नाहीये मी कोणतेही गाणं गायले नाहीये मी फक्त कलाकार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

- Advertisement -

मी अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे 450 भोजपुरी सिनेमात काम केलं आहे. मी 2003-04 साली लहंगा हे गाणं गायलं होतं आणि त्याच गाण्यामुळे मला ट्रोल करण्यात येत आहे. आता मला समजत आहे की मी काय केलं आहे इंडस्ट्री बंद झाली तेव्हा आम्ही आलो आणि आम्ही याला पुढे घेऊन गेलो. मी प्रायवेट विला करुन भोजपुरीला आठवी अनुसूचीमध्ये संसंद भवनात टाकण्यास सांगितले आहे. पण यावेळेस मला अश्र्लील गाण्यांवर कडक कारवाई करावी लागणार आहे. ज्या भाषेमुळे लोकांचे मला प्रेम मिळाले त्या भाषेसंबधित जर आपण गप्प राहीलो तर हे चुकीचे ठरणार आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतेय की भोजपुरीचा अर्थ अश्लीलता आहे हे योग्य नाहीये. चांगल्या गोष्टींवर आपल्याला सिनेमा तयार करायला हवा. आपली भाषा 25 कोटी लोंक पुर्ण विश्वात बोलण्यात येते इथूनच प्रधानमंत्री मंत्री तयार झाले आहेत. प्रधानमंत्री यांचा संदेश स्वच्छ भारत आहे तर मला ज्या इंडस्ट्रिने प्रेम दिलं आहे त्याला स्वच्छ करण्याच मी प्रर्यत्न करेन.


हे हि वाचा – प्रेग्नेंसीच्या चर्चांनतर नुसरत जहाँने पहिल्यांदाच केला फोटो शेअर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -