‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनला साऊथ अभिनेता चिरंजीवीचा आवाज

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच १५ जून रोजी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज केले जाईल

अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट २०२२ मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच १५ जून रोजी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज केले जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, असं सांगण्यात येत आहे की, साउथ अभिनेता चिरंजीवी सुद्धा या चित्रपटाचा एक भाग बनणार आहे.

करण जौहरने दिली माहिती

 करण जौहरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचे टीजर शेअर करत माहिती दिली आहे की ,’ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या तेलगू वर्जनला तेलगू अभिनेता चिरंजीवी याचा आवाज असणार आहे. करणने खाली कॅप्शनमध्ये लिहिले की, “टीम ‘ब्रह्मास्त्र’मध्ये तुमचे स्वागत आहे, चिरंजीवी सर! मी स्वतःला खूप भाग्यवान समजत आहे कारण, तुम्ही ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या तेलगू वर्जनला तुमचा आवाज दिला आहे. तुमची प्रतिभा आणि भव्यतेने ‘ब्रह्मास्त्र’ टीमला मजबूत बनवण्यासाठी धन्यवाद!”

एस एस राजमौलीची सुद्धा मिळाली आहे साथ

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला साउथमध्ये प्रदर्शित करण्यासाठी बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी जबाबदारी घेतली आहे. एस एस राजामौली या चित्रपटाला चार भाषांमध्ये प्रदर्शित करणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर दक्षिण राज्यांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेला होता. त्यावेळी एस एस राजामौली सुद्धा रणबीर कपूर सोबत होते.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची स्टारकास्ट
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे शूटिंग जवळपास गेल्या ५ वर्षांपासून चालू आहे. रणबीर आणि आलिया शिवाय अयान मुखर्जी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन , नागार्जुन , मौनी रॉय आणि डिंपल कपाडिया सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच १५ जून रोजी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज केले जाईल.