सिद्धार्थची सायना नेहवालवर अश्लील कमेंट, महिला आयोगानेही प्रकरणाची घेतली दखल

सिद्धार्थ विरोधात आयटी कायद्यातंर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. इतकेच नाही तर ट्विटवरला सिद्धार्थचे ट्विट हटवण्याची विनंती देखील महिला आयोगाकडून करण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलीस आणि ट्विटरकडून या प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागवण्यात आला आहे.

South actor Siddharth obscene comment on Saina Nehwal, womens commission filed FIR against Siddharth
सिद्धार्थची सायना नेहवालवर अश्लील कमेंट, महिला आयोगानेही प्रकरणाची घेतली दखल

बॉलिवूड तसेच अनेक साउथ सिनेमांमधील अभिनेता सिद्धार्थ (South actor Siddharth)  त्याच्या बेताल वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतो. सिद्धार्थ पुन्हा एकदा त्याच्या बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलाय. यावेळी सिद्धार्थने थेट स्टार बॅडमिंटन आणि भाजप पक्षाची सदस्य सायन नेहवालवर ( Saina Nehwal)  अश्लिल कमेंट केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय. सिद्धार्थच्या या अश्लिल कमेंटची दखल थेट महिला आयोगाकडून ( womens commission ) घेण्यात आली आहे. या कमेंटमुळे सिद्धार्थविरोधात महिला आयोगाकडून FIR दाखल करण्यात आली आहे.

सायनाच्या ट्विटवर सिद्धार्थने केलेल्या कमेंटमुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. महिला आयोगाकडून सिद्धार्थला नोटीस बजावण्यात आली आहे. सिद्धार्थ विरोधात आयटी कायद्यातंर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. इतकेच नाही तर ट्विटवरला सिद्धार्थचे ट्विट हटवण्याची विनंती देखील महिला आयोगाकडून करण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलीस आणि ट्विटरकडून या प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागवण्यात आला आहे.

 

सायना नेहवालच्या ट्विटवर केलेल्या कमेंटवर शिवसेनेच्या संसदेतील नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील सिद्धार्थच्या कमेंटवर जाहीर आक्षेप नोंदवला आहे. ‘कोणासाठीही असे शब्द वापरणे हे अस्वीकार्य आणि अशोभनीय आहे. काही पण असो पण भाषेत सभ्यता असणे गरजेचे आहे’, असे ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

पाच जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये झालेल्या प्रकारावर सायना नेहवालने ट्विट करत आपली प्रतिक्रीया दिली. त्यानंतर सायनाच्या ट्विटवर अभिनेता सिद्धार्थने ‘शेम ऑन यू रिहान’ असे दोन अर्थाचे डबल मिनिंग भाषेत ट्विट केले. या ट्विट नंतर सायनाच्या चाहत्यांनी यावर आक्षेप घेतला.त्यानंतर महिला आयोगाकडून देखील याची दखल घेण्यात आली.

काय होतं सायनाचे ट्विट?

सायनाने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीविषयी तिचे मत व्यक्त करत ट्विटमध्ये म्हटले होते की, जेव्हा देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होतो तिथे कोणताही देश स्वत:ला सुरक्षित असल्याचा दाव करू शकत नाही. पंतप्रधान मोदींनी अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते.

 

हा वाद वाढल्यानंतर सिद्धार्थने याबाबत वक्तव्य केलेय तो म्हणाला, त्यांनी म्हटले की त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहेत. मात्र कोणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नाही, असे सिद्धार्थने म्हटले आहे.

काय म्हणाली सायना?

सिद्धार्थ कमेंटनंतर सायनाने यावर प्रतिक्रीया दिली. ती म्हणाली, सिद्धार्थचा या मागे काय उद्देश आहे मला माहिती नाही. सिद्धार्थ एक अभिनेता म्हणून आवडत होता मात्र त्याचे ट्विट योग्य नाही. तो स्वत:चे मत वेगळ्या शब्दात व्यक्त करू शकला असता. पण मला असे वाटते की, ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचे शब्द आणि टीका यांच्याकडे लक्ष ठेवले जाते.


हेही वाचा – ‘स्कूटर वाल्यावर प्रेम का केलंस?’, दोन मुलं झाल्यावर Kapil Sharmaचा बायकोला प्रश्न